हवामान तज्ञ पंजाबराव डख शेतकरी मेळाव्यासाठी येणार पारनेर ला
हवामान तज्ञ पंजाबराव डख शेतकरी मेळाव्यासाठी येणार टाकळी ढोकेश्वर
टाकळी ढोकेश्वर प्रतिनिधी – प्रविण आदमाने
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे रविवारी ( ता.29 जून ) रोजी हवामान तज्ञ पंजाब डख यांच्या उपस्थितीमध्ये शेतकरी मेळाव्याचे आयोजन भीमाप्पा मंगल कार्यालय येथे ठीक दहा वाजता आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे. डख आपल्या अचूक हवामान अंदाज आणि शेतीविषयक सल्ल्यासाठी ओळखले जातात, ते या मेळाव्यात शेतकऱ्यांना हवामान बदल, पिकांचे नियोजन, आणि शाश्वत शेती पद्धतीवर मार्गदर्शन करणार आहे शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि हवामान बदलाशी सामना करण्याच्या पद्धतीची माहिती मिळावी हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.
