कामगार नेते रविश रासकर यांचे मंगळवारी सुपा टोलनाका येथे उपोषण.
कामगार नेते रविश रासकर यांचे मंगळवारी सुपा टोलनाका येथे उपोषण.
प्रतिनिधी/प्रतिक शेळके:
आत्ताच झालेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार नगर शिरूर हा रस्ता अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत.ठिकठिकाणी अनाधिकृत फोडलेले आहेत. कुठल्याही चौकामध्ये गावचे दिशादर्शक फलक नाही. रस्त्याच्या बाजूने वृक्ष लागवड इस्टिमेट मध्ये असतानाही कुठेही वृक्ष लागवड झालेली नाही. रात्री रस्त्यावर गाड्या चालवताना साईडने पांढरा साईट पट नसल्याने यांना रस्त्याचा अंदाज येत नाही व अपघात होऊन मनुष्य हानी होते. रस्त्यावर लेयर देणे गरजेचे असलेल्या कारणांनी तरीही रस्त्यावर कुठल्याही प्रकारचे लेयर देत नाहीत. रस्त्यावर अपघात झाल्यानंतर सुपा टोल नाक्यावर कुठलीही इमर्जन्सी सुविधा उपलब्ध नाही. ॲम्बुलन्स, क्रेन, जेसीबी ही कुठलीही सुविधा उपलब्ध नाही. वारंवार पाठपुरावा पm करूनही सुपा टोल मॅनेजमेंट ने कुठल्याही प्रकारची रस्त्यावर सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला नाही.
शिरूर नगर रस्ता हा पूर्णतः निकृष्ट झाल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुपा टोलनाका हा बंद करण्यात यावा. वाहन चालकांना व गोरगरीब सामान्य जनतेची लूट थांबवावी. सुपा टोलनाका हा मंगळवार पर्यंत बंद झाला नाही. तर कामगार नेते रविश रासकर हे दिनांक- ०९/०९/२०२५ वार – मंगळवारी या दिवशी सुपा टोल नाका कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहे. त्यानंतर होणाऱ्या हानीस सर्वस्वी शासन जबाबदार राहील. कामगार नेते रविश रासकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर अधिकारी बढध्ये साहेब यांना निवेदन दिले. सुपा पोलीस स्टेशन, सुपा टोल नाका, एसपी ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय यांना त्याच्या प्रति दिल्या.
