रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ढवळगाव मध्ये आपघात महिला प्रवासी वाचल्या
रस्त्याचे काम चालू असताना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ढवळगाव मध्ये आपघात प्रवासी वाचले
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात दिशादर्शक फलक नसल्याने तसेच रस्त्यावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत उपाय योजना केलेल्या नसल्याने रस्त्याच्या कामात प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत असून याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.ठेकदाराच्या हलगर्जीपणामुळे धोकादायक रस्त्यामुळे वाहनचालकाना नेहमी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.तसेच ढवळगाव येथील वाळुंज माळा येथे श्रीगोंदा रोडने शिरूर च्या दिशेने जाताना रस्त्याचे काम करून रस्ता मोठा झाला असून परंतु पुढे असलेल्या अरुंद पुलावरून व त्याठिकाणी दिशादर्शक फलक व सुरक्षेचे काळजी न घेतल्यामुळे वाहना वरिल चालकाचा गाडीवरील ताबा सुटून एम.एच .42 ऐ.एक्स 6371 ही स्विफ्ट डिझायर गाडी पुलावरून खाली गेली परंतु सुदैवाने गाडीतील चालक व महिला प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. परंतु अशा दुर्घटना व अपघात याकडे स्थानिक पदाधिकारी आणि एम.एस. आय.डी.सीच्या लक्ष देण्याची गरज आहे. गव्हाणवाडी फाटा ते श्रीगोंदा या सुमारे २०० कोटी रुपयांच्या ४३ किलोमीटर रस्त्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. हा रस्ता गव्हाणवाडी फाट्या पासून जवळपास श्रीगोंदापर्यंत रस्ता मजबुतीकरणासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुमारे दोन फुटा पासून पाच फूट पर्यंत खोदलेला आहे. मात्र काम सुरू असताना रस्त्याच्या ठेकेदाराने रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावर कोठेही दिशा दर्शक फलक, अथवा मार्गदर्शक फलक लावलेले दिसून येत नाहीत तर उकरलेल्या रस्त्यावर देखील बऱ्याच ठिकाणी सुरक्षा साधनांचा अभाव दिसून येत आहे. रस्त्याचे खोदकाम करीत असतांना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारच्या धोक्याच्या सूचना किंवा खूणा दर्शविण्यात आलेल्या नाहीत. रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी जवळजवळ २ ते ५ फुटांचे खड्डे आहेत. त्याठिकाणी
बॅरिकेट्स अथवा जाळ्या लावणे आवश्यक असतांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षिततेच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. रस्त्याच्या कामादरम्यान सूचना फलक नसल्याने दिवसा तसेच रात्रीच्या वेळेस रस्त्याचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. रस्त्याच्या कामात अनेक ठिकाणी खड्डे,अडथळे आणि इतर धोकादायक गोष्टी असून सूचना फलक नसल्यास वाहन
चालकांना या धोक्यांची कल्पना येत नाही. त्यातच खोदलेल्या रस्त्यावर पाणी न मारताच काम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात धूळ पसरत आहे.
