पळवे खुर्द येथे राजकीय भूकंप शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये खासदार निलेशजी लंके यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा अधिकृत प्रवेश
पळवे खुर्द येथे राजकीय भूकंप शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये खासदार निलेशजी लंके यांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचा अधिकृत प्रवेश
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर
पळवे खुर्द येथे खासदार श्री.निलेश लंके यांच्या उपस्थिती मध्ये श्री.भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव श्री.पोपट तरटे विश्वस्त श्री.दत्तात्रय जगताप, उमाजी नाईक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री.हरिभाऊ भंडलकर उद्योजक भाग्येश शशिकांत देशमुख,उपसरपंच बाळासाहेब जाधव, लहुजी संघटनेचे नेते कृष्णा शेलार,या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षा मध्ये अधिकृत प्रवेश केला.महाविकास आघाडीच्या लोकप्रिय उमेदवार सौ. रानीताई निलेश लंके यांना या प्रवेशाने बळ मिळणार आहे.
या प्रवेशासाठी सैनिक बँक संचालक श्री.संजय तरटे तसेच सरपंच प्रसाद तरटे यांच्या मध्यस्तीला यश आले असून उमेदवार राणीताई लंके यांना गावामधून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होऊन प्रयत्न करणार असल्याचे तरटे, भंडलकर,जगताप,देशमुख,जाधव,शेलार,यांनी सांगितले
यावेळी लोकप्रिय खासदार नीलेश लंके,सरपंच प्रसाद तरटे, सैनिक बँक संचालक श्री. संजय तरटे,चेअरमन संदीप देशमुख,तात्यासाहेब देशमुख,पोपट पाचारणे,अमोल शेळके,शांताराम तरटे,पोपट नवले,अविनाश ढोरमले सतीश भालेकर,विशाल तरटे,अमोल तरटे,बाळू गाडीलकर,ऋषी तरटे,रविराज तरटे, सूरज तरटे निखिल दरेकर,इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
