थार गाडीचा थरार ,थार गाडीने तीन जणांना उडवले , तिन जणांची प्रकृती गंभीर
थार गाडीचा थरार ,थार गाडीने तीन जणांना उडवले , तिन जणांची प्रकृती गंभीर
श्रीगोंदा प्रतिनिधी – ( अमोल बोरगे )
ढवळगाव मध्ये बस स्टॅन्ड वरती सकाळी सातच्या सुमारा थार गाडीने ( MH-12-WP-8933 ) तीन जणांना उडवले , तिघांची प्रकृती गंभीर .सविस्तर वृत्त असे की सकाळी सातच्या सुमारास ढवळगाव बस स्टँड वरती कॉलेजला जाण्यासाठी एसटीची वाट पाहत असलेली विद्यार्थी व प्रवासी थांबले असता.रस्त्याच्या दहा फुट लांब एका पाटी च्या मागे थंडी वाजत असल्यामुळे शेकोटी करून सेकत थांबले होते. त्याच वेळेस अचानक भरधाव वेगाने गाडी सुसाट येऊन तिघांना उडवले त्यामध्ये सुभाष नारायण आढाव , शिवाजी नारायण आढाव ( दोघे राहणार आरणगाव दुमाला ) तेजश बाळु शिंदे ( रा. ढवळगाव ) यांना उडवले असून .त्यातील दोघांचे पाय मोडल्याचे मदत कार्य करणाऱ्या प्रथमदर्शी यांनी सांगितले आहे .पुढील उपचारासाठी शिरूर येथे अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले आहे.
मोठा अनर्थ टळला
पाच मिनिटांपूर्वीच त्या ठिकाणावरून एसटी शिरूर कडे गेली होती त्यावेळी वीस ते पंचवीस विद्यार्थी त्या एसटीमध्ये गेले होते , अन्यथा मोठा अनर्थ घडला असता
