शिवसेनेचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना वाढता पाठिंबा
शिवसेनेचे अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना वाढता पाठिंबा .
पारनेर :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत आता रंगत येवू लागली असून शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांना मतदार संघात वाढता पाठिंबा मिळू लागल्याने इतर उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत .
ही निवडणूक दुरंगी आहे , असे वाटत असताना शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत असलेले संदेश कार्ले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी करत पारनेर – नगर विधानसभेतील मतदार संघात प्रचाराचे रान उठविले असून नुकतेच खा . निलेश लंके यांनी नगर तालुक्यात कार्ले यांच्यावर कडक टिका केल्याने संदेश कार्ले यांच्या समर्थक व शिवसैनिकांना ते रूचले नाही , परिणामी हे सर्व पायाला भिंगरी लावून दुप्पट वेगाने संदेश कार्ले यांचा प्रचार करू लागले आहेत .
नगर तालुक्यात शेती माल बाजारभाव , पाणी प्रश्न , रस्त्या चा प्रश्न वा इतर कोणते प्रश्न असो , यावर आंदोलन करण्याची वेळ आली तर संदेश कार्ले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते . येथील पाणी प्रश्न मार्गी लावल्याने पारनेर तालुक्यातील महिलांचा ही पाणी प्रश्न मार्गी लावून डोक्यावरील हंडा उतरविणार असल्याचा विश्वास महिला व्यक्त करत आहेत .
पारनेर – नगर मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके , युतीचे उमेदवार काशिनाथ दाते , शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार संदेश कार्ले , विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी , माजी नगराध्यक्ष विजू औटी हे प्रमुख उमेदवार नशिब आजमावत आहेत . यातील ४ उमेदवार हे पारनेर तालुक्यातील असून तालुक्यातील मतदान या ४ उमेदवारां मध्ये विभागले जाणार असल्याने उर्वरित १ अपक्ष उमेदवार संदेश कार्ले हे नगर तालुक्यातील असल्यामुळे तेथे मतदार व प्रचार त्यांच्या भोवती फिरताना दिसून येत आहे .
संदेश कार्ले हे पंचायत समितीचे सदस्य व तदनंतर सभापती पदी विराजमान होऊन तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावण्या ने शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांच्या कामाची पावती म्हणून शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली . मदतीला धावणारा , कामाचा माणूस म्हणून नगर तालुक्यात त्यांची स्वतंत्र व प्रचंड ओळख असल्याने ते जेथे प्रचारासाठी जातात , तेथे तरुणांपासून वृद्धांपर्यंत मोठी गर्दी पाहावयास मिळते .
