तरुणांच्या प्रसंग सावधानीने ओढ्यावरील पुल वाचला
तरुणांच्या प्रसंग सावधानीने ओढ्यावरील पुल वाचला
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील वाघमारे वस्ती कडे जाणाऱ्या शिव रस्त्यावरील ओढ्यावरील पुलावरून सतत होणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे पुलावरून पाणी जात होते तसेच तो पुल दुरुस्ती अभावी शेवटची घटका मोजत असल्याकारणाने फुल कधीही वाहून जाऊ शकतो.अवकाळी पावसाच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये पुरामध्ये नारळाच्या झावळ्या ,प्लास्टिक कागद, गोण्या, पाचरट इत्यादी वाहून आल्यामुळे पुलाच्या पाणी जाण्याच्या मार्गामध्ये मध्ये अडकून बसले पाण्याचा प्रवाह थेट पुलावरून वाहू लागला ही घटना देवदैठण येथील तरुणांच्या लक्षात आल्यानंतर अमोल कौठाळे,निलेश कौठाळे, शुभम कौठाळे ,ओंकार कौठाके, हरिभाऊ वाघमारे, विलास वाघमारे, शांताराम वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे ,अभय वाघमारे ,विश्वास कोकाटे,यांनी श्रमदान करून पुलातील गुंतलेला कचरा काढला तसेच अमोल रामचंद्र वाघमारे यांनी कचरा काढण्यासाठी जेसीबी सौजन्य देऊन सहकार्य केले तरुणांच्या या प्रसंग सावधनेचे देवदैठण ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
