राजापुर मध्ये बिबट्याने तिन शेळ्या जाग्यावर मारल्या दोन नेल्या, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
राजापुर मध्ये बिबट्याने तिन शेळ्या जाग्यावर मारल्या दोन नेल्या, शेतकऱ्याचे मोठे नुकसान
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथे माठ रोड लगत राहणारे संतोष मच्छिंद्र ढवळे यांच्या घरासमोरील गोठ्यामधील बांधलेल्या तीन शिळ्या बिबट्याने मारल्या असून दोन शेळ्या ह्या बिबट्याने नेल्या असल्याची घटना मध्यरात्री २ च्या सुमारास बुधवार (दिं.२८) रोजी घडली. गोठ्यामध्ये शेळ्यांचा आवाज आला म्हणून घरातील माणसे जागी झाले त्यांनी गोठ्यात जाऊन पाहिले तर गोठ्यामध्ये तीन शेळ्या ह्या तडफडत होत्या त्यांच्या गळ्यावरती बिबट्याने हल्ला करून जखमी केले होते व काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला. दोन शेळ्या बिबटे घेऊन गेले त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वनरक्षक दिनेश हुंबरे व वनपाल हनुमंत रणदिवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला असून परिसरामध्ये दोन बिबट्याचे ठसे निदर्शनात आले आहे.या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यावेळी वनरक्षक दिनेश हुंबरे व वनकर्मचारी हनुमंत रणदिवे ,मा.सरपंच सचिन चौधरी,धनंजय मेंगवडे, उपस्थित होते.
