आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत दिवटे पाटिल पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा तृतीय क्रमांक
आंतरशालेय समूहगीत स्पर्धेत दिवटे पाटिल पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा तृतीय क्रमांक
प्रतिनिधी/प्रतिक शेळके:-
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मीडियम स्कूल, शिरूर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन शिरूर येथे करण्यात आले होते या स्पर्धेत दिवटे पाटील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सुपाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी भाग घेत कॉलेजने तिसरा क्रमांक मिळविला या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर व महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीचे माजी अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते या वेळी शिरूर शहर विकास आघाडीचे अँड. सुभाष पवार माजी प्राचार्य सदाशिव सोवनी, मराठी साहित्य परिषद शाखा शिरूरच्या कार्याध्यक्षा प्रा. डॉ. क्रांती पैठणकर, अविष्कार फाउंडेशनचे प्रा. विलास आंबेकर, माजी मुख्याध्यापक व्हि. डी. कुलकर्णी , दिवटे पाटील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य पळसकर एस. डी., सहशिक्षक ,कविता पवार संगीत शिक्षक अंकुश चव्हाण यावेळी उपस्थित होते.
