पारनेर तालुका सकल मराठा समाज यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा आंदोलनावर तोडगा न निघाल्यास सुपा चौक येथे रास्ता रोको पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..
पारनेर तालुका सकल मराठा समाज यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा
आंदोलनावर तोडगा न निघाल्यास सुपा चौक येथे रास्ता रोको
पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाचा इशारा..
प्रतिनिधी : प्रतिक शेळके
आझाद मैदान येथे चालू असलेल्या मा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालय यांना निवेदन देण्यात आले.
राज्यातील मराठा समाज सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागासलेला असून या समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी मराठा समाजाचे संघर्षयोध्दा मा. श्री. मनोज दादा जरांगे पाटील हे २९ ऑगस्ट २०२५ पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसलेले आहेत. तरी त्यांच्या सर्व मागण्या रास्त व संयुक्तिक असून, त्यांच्या आमरण उपोषणाला पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा व समर्थन देण्यात आले. तसेच उपोषण आंदोलनातून तोडगा न निघाल्यास सुपा चौक येथे शुक्रवारी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला.
यावेळी बुचुडे सर, योगेश रोकडे, वसंत साठे, बबन गुंड, संतोष वाबळे, राहुल गुंड, गोरख पठारे, एकनाथ बालवे, विठ्ठल देठे, आनंदा मोरे, युवराज शिंदे, अनिल शिंदे, मच्छिंद्र मते, रामराव गाडेकर, कांतीलाल करंजुले, शेखर ठुबे,दिलीप काळे, मनोज तामखडे व पारनेर तालुका मराठा समाज उपस्थित होता.
