अरणगाव दुमाला येथे सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद
अरणगाव दुमाला येथे सप्ताहात मुस्लिम समाजाकडून महाप्रसाद
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला या गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, त्यात मुस्लिम समाजाने हभप कबीर महाराज अत्तार यांचे किर्तन तसेच संपूर्ण गावाला महाप्रसाद देत एकात्मतेचे दर्शन घडवले.
देशात सध्या जातीजातीत, धर्मा-धर्मातील अंतर वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर अरणगाव दुमाला या गावाने सामाजिक एकतेचे दर्शन घडवले. या गावात अनेक जातींचे लोक राहतात. सर्व जातीधर्माचे लोक सहभागी होत असतात. येथे सर्व जातीधर्माचे लोक एकत्र नांदतात.
प्रत्येक धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या आनंदाने सहभागी होतात. गावात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून, रविवारी मुस्लिम समुदायाने संपूर्ण गावाला महाप्रसादाचे जेवण दिले. या कार्यक्रमासाठी मुस्लिम समाजासह इतर सर्व जातीधर्माचे तरुण-तरुणी महिला पुरुष सहभागी झाले होते.
महाराज म्हणाले, की भगवंत भक्तांची जात पाहत नाही, तो फक्त भगवंताची भक्ती करतो, त्याला तो प्राप्त होतो.त्यांनी आपल्याला प्रतीकुल परिस्थित साथ दिली त्यांना कधीच विसरू नका आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे शेवटी महाराजांचा सन्मान मुन्नाभाई जहागिरदार हनिफभाई शेख आणि मुस्लिम बांधवांनी केला
