अखेर लेखी आश्वासनानंतर कामगार नेते रविष रासकर यांचे उपोषण मागे
अखेर लेखी आश्वासनानंतर कामगार नेते रविष रासकर यांचे उपोषण मागे
प्रतिनिधी/ प्रतिक शेळके-
रविश रासकर यांचे उपोषण काल 18/ 8/ 2025 रोजी एमआयडीसी कार्यालय नवनागापूर यांच्या गेट समोर सुरू करण्यात आले होते. सुपा एमआयडीसी मधील एस्टीमेट नुसार खराब रस्त्यांच्या कामामुळे उपोषण करण्यात आले होते.
कागदपत्रे आम्हाला पाहिजे होते ते शुक्रवारी देणार आहे. आणि रस्त्यांची कामे हे बाकी असल्यामुळे ते आम्ही पावसाळ्यानंतर करून घेऊ असे सांगितले.
त्यानंतर कामगार नेते रविश रासकर यांनी हे उपोषण अधिकाऱ्यांच्या हस्ते सोडण्यात आले. त्यावेळेस सहाय्यक उपअभियंता अनिल पांढरे, MIDC अधिकारी, पोलिस अधिकारी शेरकर साहेब, प्रवीण दळवी, तेजस गायकवाड, यश पिसाळ, कुणाल अंगरखे, दादा शेळके आणि सहकारी उपस्थित होते.
