सुपा जुनी एमआयडीसी आणि सुपा फेज 2 एमआयडीसी मधील रस्त्यांचे कामे निकृष्ट केल्यामुळे सदर ठेकेदार आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी रविश रासकर यांचे 18 ऑगस्ट रोजी उपोषण
सुपा जुनी एमआयडीसी आणि सुपा फेज 2 एमआयडीसी मधील रस्त्यांचे कामे निकृष्ट केल्यामुळे सदर ठेकेदार आणि ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी
रविश रासकर यांचे 18 ऑगस्ट रोजी उपोषण
प्रतिनिधी – प्रतीक शेळके / सुपा
सुपा दोन्ही एमआयडीसीमध्ये रस्त्याची कामेही अफजल शेख या ठेकेदाराने केलेली आहे. जुनी एमआयडीसी मधील कामे हे इस्टिमेट नुसार अतिशय निकृष्ट झालेले आहे. त्यासाठी लागणारे सर्व पुरावे हे मी एमआयडीसी ऑफिस आणि सर्व एमआयडीसी अधिकाऱ्यांना सादर केले आहे तरीही वारंवार पाठपुरावा करून सदर ठेकेदारावरती आणि दोषी अधिकारांवरती आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे कामगार नेते रविश रासकर हे १८/०८/२०२५ रोजी एमआयडीसी कार्यालय नवनागापूर यांच्या ऑफिस समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत.
कामगार नेते रविश रासकर यांनी दोन्ही एमआयडीसी मधील इस्टिमेट नुसार कोणतेही काम झाले नसल्याकारणाने उपोषणाचा पवित्त्रा अवलंबला आहे. सुपा जुन्या एमआयडीसीमध्ये जे इस्टिमेटचं काम झाले ते काम संपायच्या आधीच त्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. कुठल्याही प्रकारची साईट पट्टी नाही. मार्किंग नाही. गटार नाही. इस्टिमेट नुसार कोणती सोय नाही. नवीन एमआयडीसीमध्येही रस्त्यावर आत्ता चालू असलेल्या कामांमध्ये रस्त्यावर रस्त्यावरच्या पट्ट्या पण मारलेला नाहीत. आणि रस्ते काम संपायच्या आधीच रस्ते उखडले आहेत. त्यामुळे या रस्त्यांच्या कामाची चौकशी होऊन जर हे काम इस्टिमेटनुसार झाले नसले तर कामगार नेते रवी रासकर हे जोपर्यंत दोषी ठेकेदारावरती आणि त्याला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होत नाही आणि तोपर्यंत रविश रासकर हे उपोषणा वरून हटणार नाही. आणि तसेच झाले नाही तर रविश रासकर यांच्या होणाऱ्या जीवितासजबाबदारी प्रशासन राहील.
