ताज्या घडामोडी

कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल

कॅरिअर मायडीया कंपनीत महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग ! HR आणि वर्कमॅनवर गुन्हा दाखल

पारनेर प्रतिनिधी/प्रतिक शेळके 

कॅरिअर मायडीया या बहुराष्ट्रीय कंपनीचा एच.आर. पंकज यादव तसेच वर्कमॅन ऋषीपालसिंग यांनी कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षा रक्षकाचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पीडित महिलेने सुपा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गेल्या दिड वर्षांपासून पिडीत महिला कॅरीअर मायडीया या कंपनीमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होती. सकाळी सात वाजता केडगांव, नगर येथून कंपनीच्या बसमधून म्हसणे फाटा येथील एमआयडीसीमध्ये येऊन दुपारी साडेतीन वाजता ही महिला केडगाव येथे परतत असे.केडगांव येथे वर्कमॅन ऋषीपालसिंग हा देखील वास्तव्यास आहे. तो देखील कंपनीच्या बसने सकाळी सात वाजता औद्योगिक वसाहतीमध्ये येत असे. दि.१६ नोव्हेंबर २०२४ रोजी ऋषीपालसिंग याने पिडीत महिलेस महिलांच्या स्वच्छतागृहाजवळ बोलवून तिला पैसे देऊ केले. मात्र पैसे घेण्यास महिलेने नकार दिल्यानंतर तु मला फार आवडते असे म्हणत ऋषीपाल याने पिडीतेचा हात धरून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे.वकॅमॅनपाठोपाठ कंपनीचा एच आर पंकज यादव याचाही त्याच महिलेवर डोळा होता. तो महिलेस मला तुला भेटायचे आहे, तु रस्ता बदलला, तु मला खुप आवडतेस असे वारंवार म्हणत असे. तुझया मुलांना कंपनीत नोकरीस लावतो असे अमिष दाखवत पंकज वारंवार पिडीतेची छेड काढत असे. कंपनीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा अन्याय सहन न झाल्याने पिडीतेने ॠषीपाल सिंग व पंकज यादव यांच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली.

दाद न दिल्याने कामावरून काढून टाकले

पंकज यादव व ॠषीपालसिंग हे दोघे कंपनीमध्ये चांगल्या पदावर असल्याने दोघेही पिडीतेस नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत होते. पिडीत महिलेने दोघांनाही दाद न दिल्याने त्या महिलेस कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!