अजित लोंढे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
अजित लोंढे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी –
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगावच्या उपसरपंचपदी अजित नामदेव लोंढे यांची निवड करण्यात आली. उपसरपंच मनीषा राहुल बोरगे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी लोंढे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. अजीत लोंढे यांच्या नावाची सरपंच अनिता वाळुंज यांनी सूचना मांडली त्यास सारिका शिंदे यांनी अनुमोदन दिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी शशिकांत गायकवाड यांनी काम पाहिले.त्यांना ग्रामपंचायत कर्मचारी सुनील शिंदे यांनी मदत केली. तसेच सर्वांना सोबत घेऊन गावचा सार्वंगीन विकास करणार आशी ग्वाही नवनिवार्चीत उपसरपंच अजित लोंढे यांनी दिली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सारिका शिंदे, मनीषा राहुल बोरगे, गणेश ढवळे, गणेश पानमंद, रवींद्र शिंदे, विजय शिंदे,आर .टी. शिंदे सर ,अभिजित ढवळे, भाऊसाहेब पानमंद,माणिकराव ढवळे, तुषार तांबे , अभिजीत ढवळे , कोंडीभाऊ ढवळे ,सुधीर पोखरकर , बाबासाहेब शिंदे , गौतम वाळुंज , रामचंद्र लोंढे , शिवाजी लोंढे ,युवा नेते महिंद्र लोंढे ,सचिन लोंढे , किशोर लोंढे , मेजर भाऊ सातव , कृष्णा पोखरकर , तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण शिंदे , नानासाहेब वाळुंज , अजय वाळुंज , सुदाम पवार इत्यादी ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते .
