अखेर दानेवाडी येथील माऊली गव्हाणे च्या हत्याकांडातील आरोपी सापडले ?
अखेर दानेवाडी येथील माऊली गव्हाणे च्या हत्याकांडातील आरोपी सापडले ?
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे खांडोळी केलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नव्हती परंतु, दिं 15 मार्च रोजी दाणेवाडी गावातील दुसऱ्या विहीरीमध्ये पोत्यामधे शरिराचे इतर आवयव सापडले आहेत ते अवयव माउली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजारा मृत तरुणाच्या कुटुंबांनी दिला आहे. माऊलीच्या कानातील बाळी वरून आईने हा मृतदेह माऊलीचा असल्याचे सांगितले आहे. परंतु आज पहाटे बेलंबडी व अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयित ताब्यात घेतले होते व त्या संशयित यांनी कबुली दिल्याचे कळत आहे ? पुढील तपासासाठी पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे ,स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर , उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे , बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष भंडारे हे दानेवाडी गावामध्ये घटनास्थळी घेऊन गेले आहेत.
स्रोत – सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार
