ताज्या घडामोडी

अखेर दानेवाडी येथील शिर नसलेल्या मृतदेहाचे शिर व इतर आवयव सापडले , कानातील बाळी वरून मृतदेह ओळखला !

अखेर दानेवाडी येथील शिर नसलेल्या मृतदेहाचे शिर व इतर आवयव सापडले , कानातील बाळी वरून मृतदेह ओळखला !

श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे 

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे खांडोळी केलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नव्हती परंतु आज दिं १५ मार्च रोजी दाणेवाडी गावातील दुसऱ्या विहीरीमध्ये पोत्यामधे शरिराचे इतर आवयव सापडले आहेत ते अवयव माउली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजारा मृत तरुणाच्या कुटुंबांनी दिला आहे. परंतु बेलवंडी पोलीस यांच्या कडून अधिकृत माहीती भेटू शकली नाही . माऊलीच्या कानातील बाळी वरून आईने हा मृतदेह माऊलीचा असल्याचे सांगितले आहे. सामाजिक नेते श्री. दौलत नाना शितोळे हे या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले असतात त्यांनी सर्व परिस्थिती समजून घेतली व त्यांना कुटुंबांनी सांगितले की पोलीस प्रशासन सहकार्य करत नाही आम्ही दुसऱ्या आजूबाजूच्या विहीरी मध्ये पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी करत आहोत परंतु पोलीस प्रशासन सांगत आहे आम्हाला आपत्ती व्यवस्थापन टीम भेटत नाहीत ती फक्त नैसर्गिक आपत्ती आल्यावरच येते आहे आसे सांगत आहे याची दखल घेऊन दौलत नाना शितोळे यांनी त्यांची स्वतःची २२ जणांची आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी पाठवली व आजूबाजूच्या विहीरी मध्ये शोध करण्यास सुरुवात केली. त्या टिमला शेजारील एका विहिरीत एक गाठोडे आसल्याचा संशय आला व त्यांनी ते वर काढले आसता त्या गाठोड्यातून दुर्गंधी येत होती. ते गाठोडे खोलण्यासाठी बेलवंडी पोलीस यांच्या कडे मोजे ( हॅण्डग्लोज ) नसल्याने व त्या ठिकाणी रुग्णवाहीका व फोरेन्स लॅब ची टिम उपस्थित नव्हती. त्यामुळे दाणेवाडी ग्रामस्त संतप्त झाले होते.
ते गाठोडे सोडले आसता त्यामध्ये मुंडके , एक पाय दोन हात सापडले व कानामध्ये आसणाऱ्या बाळी मुळे आई व वडीलांनी हा मृतदेह माऊलीचा आहे हे सांगितले व त्यांनी एकच टाहो फोडला माझ्या लेकराने आसा काय गुन्हा केला होतो कि त्याची ऐवढी निघृण पणे हात्या केली आसे वडील रडतानी सांगत होते. या निघृण हात्याचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी दाणेवाडी ग्रामस्थ व सकल गोपाळ समाजाने केली आहे.अन्यथा नगर पुणे हायवे वरती रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.स्थानिक पोलिसां वरती आमचा विश्वास नाही व या घटनेचा तपास सीआयडी कडे वर्ग करावा अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!