म्हसे गावच्या उपसरपंचपदी संतोष कातोरे यांची बिनविरोध निवड
म्हसे गावच्या उपसरपंचपदी संतोष कातोरे यांची बिनविरोध निवड
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे गावच्या उपसरपंच पदी संतोष शंकर कातोरे यांची बिनविरोध निवड (दिं.२७) रोजी सरपंच सुवर्णा सुखदेव फाजगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मा.उपसरपंच नाना सिताराम देवीवेकर यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी ही निवड पार पडली त्यामध्ये संतोष कातोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक अधिकारी ग्रामसेवक उषा झगडे यांनी बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित केले त्यांना या निवडीसाठी साह्य ग्रामपंचायत कर्मचारी भाऊसाहेब जौंजाळ यांनी केले.यावेळी सरपंच सुवर्ण सुखदेव फाजगे,मा.उपसरपंच नाना देविकार, मा.उपसरपंच रामदास भोसले,मा.उपसरपंच लक्ष्मण देवकर, ग्रामपंचायत सदस्य निता संतोष दिवेकर, मा.उपसरपंच भाऊसाहेब पवार,मा.उपसरपंच रेखा दळवी,ग्रामपंचायत सदस्य उषा देवीकर, उद्योजक बाळासाहेब खेडकर, मा.चेअरमन दादाभाऊ दिवेकर, विद्यमान चेअरमन दत्ता भोसले तसेच इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच नवर्वाचित उपसरपंच यांना मा.आमदार राहुल जगताप यांनी शुभेच्छा दिल्या.
