ताज्या घडामोडी

“नीट” च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सोहम ईश्वरे याने उज्वल यश प्राप्त केले.

“नीट” च्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात सोहम ईश्वरे याने उज्वल यश प्राप्त केले. 
प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सोहम अशोक ईश्वर याने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात “नीट” च्या परीक्षेत ७२० पैकी ५५५गुण प्राप्त करीत पहिल्याच प्रयत्नात उज्वल यश प्राप्त केले आहे. केवळ अभ्यास आणि त्यातील सातत्य ठेवल्याने त्याने हे यश संपादन केले. सोहम याने ऑल इंडियामधे १० हजार रँक तर ओबीसी मध्ये ४ हजार रँक प्राप्त केली आहे.
          सोहम याने इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. माध्यमिक शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशालेत झाले असून त्याने दहावी मध्ये ९६.२० % तर बारावी लातूर येथील आर एन मोटेगावकर कॉलेज मध्ये शिक्षण घेत बोर्डाच्या परीक्षेत ८६% गुण मिळवले. गेल्या दोन वर्षापासून नीट परिक्षेसाठी प्रयत्न, चिकाटी, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तासिकाद्वारे अभ्यास करीत हे उत्तुंग यश मिळवले आहे. 
        प्राथमिक शिक्षक असलेले अशोक ईश्वरे आणि शुभांगी ईश्वरे यांनी डॉक्टर होण्याचे 
पाहिलेले स्वप्न त्यांच्या त्यांच्या मुलाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. ईश्वरे कुटुंबातील सर्व जण उच्च शिक्षित असून सोहम याचे चुलते विठ्ठल ईश्वरे हे देखील प्राथमिक शिक्षक आहेत. अशोक ईश्वरे देत शेती तसेच व्यवसायासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देत यशस्वी शिक्षणासोबतच यशस्वी उद्योजक म्हणून परिचित आहेत.   
      विद्यार्थ्यांनी “नीट” च्या परीक्षेला न घाबरता सातत्यपूर्ण अभ्यास व सराव परीक्षांच्या माध्यमातून आत्मविश्वास पूर्वक तयारी केली तरच हमखास यश प्राप्त करता येते हे सोहम याने सिध्द करुन दाखविले आहे. सोहमच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन होऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!