ढवळगाव कारखाना चौकामध्ये पावसाच्या पाण्याने तळ्याचे स्वरूप ,ठेकेदाराचा हलगर्जीपणा मुळे नागरीक त्रस्त.
ढवळगाव कारखाना चौकामध्ये पावसाच्या पाण्याने तळ्याचे स्वरूप ,ठेकेदाराचा हलगर्जीपणा मुळे नागरीक त्रस्त.
प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यात ढवळगाव येथे साखर कारखाना चौकामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे त्यामुळे चौकामध्ये व परिसरामध्ये रहदारी साठी गैरस्वय होत असून परिसरामध्ये त्या पाण्यामुळे दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढत आहे. पाण्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढु शकते असे तेथील गाळा धारक सांगत आहेत.
सविस्तर वृत्त असे की सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत राजापुर मेंगलवाडी ढवळगाव कोंडेगव्हाण निंबवी पिंपळगांव पिसा घारगाव रस्ता प्रजिमा ५७ कि.मी मध्ये सुधारणा करणे साठी डांबरीकरणाचे काम चालू असून त्यासाठी ५ कोटी ५६ लक्ष ७५ हजार एवढा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु सदरील काम अनेक दिवसापासून कासवाच्या गतीने चालू आहे.राजापूर येथील मेंगलवाडी जवळ असणाऱ्या वीर वस्ती जवळ अंदाजे शंभर फूट रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने बाकी ठेवले आहे तसेच साईट पट्टयांमध्ये मुरुमही भरणे बाकी आहे. ढवळगाव चौकामध्ये रस्त्याच्या कडेला मुरूम न भरल्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे . वारंवार सांगून सुद्धा त्या ठिकाणी मुरूम टाकला जात नाही त्यामुळे आंदोलन करणार आहे असे ग्रामस्थांनी सांगितले आहे. या कामाचे भुमिपुजन मा.मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते पार पडले होते . तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा अहिल्यानगर यांच्या देखरेखे खाली हे काम चालू आहे.ढवळगाव ते पिंपळगाव पिसा हे काम चालू असून या ठिकाणी काम झाले आहे त्या ठिकाणी रस्ता खचुन पुन्हां खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे याविषयी माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीगोंदा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही
