ताज्या घडामोडी

पळवे खुर्द येथे मोफत महाआरोग्य शिबिर !

पळवे खुर्द येथे मोफत महाआरोग्य शिबिर!

प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :- 

 महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या श्री साईबाबा संस्थान रुग्णालयच्या माध्यमातुन पारनेर तालुक्यातील पळवे खुर्द येथील श्री भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये दिनांक 08/02/2025 रोजी एक दिवशीय मोफत महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरामध्ये हृदय रोग तपासणी, जनरल तपासणी, रक्त तपासणी, डोळ्यांची तपासणी, कानाची ऑडिओमॅट्रि तपासणी, महिलांच्या विविध आजाराची तपासणी, त्वचारोग तपासणी, कॅन्सर व हाडांच्या विविध आजाराची तपासणी या सर्व आजारावर एमडी मेडिसिन, ,अस्थिरोग तज्ञ, हृदयरोग तज्ञ स्त्रीरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, तज्ञ जनरल सर्जन, कॅन्सर तज्ञ योग्य ती तपासणी करून औषध उपचार करणार आहे शिबिरामध्ये आलेल्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांवर श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत याचबरोबर चष्मा व श्रवण यंत्राचं मोफत वाटप याप्रसंगी करण्यात येणार आहे तरी या महाआरोग्य शिबिराचा पारनेर तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा असे आवहान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर यांनी केल आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!