सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध्य धंदे बंद करा -सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे मा. जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश व सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे यांचे पोलिस निरीक्षक सुपा यांना निवेदन
सुपा पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध्य धंदे बंद करा -सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे
मा. जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश व सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे यांचे पोलिस निरीक्षक सुपा यांना निवेदन
प्रतिनिधी – अमोल बोरगे ( मुख्य संपादक )
सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध्यरीत्या चालू असलेले सुपा नवीन म्हसणे फाटा M.I.D.C तसेच नगर पुणे हायवे वरती हॉटेल जयराज आणि हॉटेल राखी पलेस (सौंदर्या इन ) जातेगाव फाटा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती देह विक्री (वेश्या व्यवसाय )चालतो तसेच हायवे लगत असणार्या हॉटेल वरती अवैध्य मार्गाने रात्रीच्या वेळेस येणाऱ्या गाड्यांमधून सळई ,अनेक प्रकारचे लोखंड व भंगार हे खरेदी केले जाते तसेच हायवे लगत असणारे धाबे ,हॉटेल,व टपरया यांसवरती दारू विक्री,गुटखा विक्री ,गांजा विक्री असे व्यवसाय चालतात तसेच म्हसणे फाटा येथील नवीन M.I.D.C व सुपा येथील जुनी M.I.D.C यामध्येही मोठ्या प्रमाणात टपरयावरती व हॉटेल वरती मोठ्या प्रमाणात दारू, गांजा,व गुटखा विक्री केला जातो तसेच सुपा परिसरात चोरट्या पद्धतीने मटका व इतर अवैध्य व्यवसाय चालू असून तसेच म्हसणे फाटा ,सुपा नवीन M.I.D.C व जुनी M.I.D.C व वाघुंडे यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध्या रित्या सिलेंडर मधून ५ किलोच्या छोट्या टाकीमध्ये अनाधिकृतपणे रहदारीच्या ठिकाणी गॅस भरून दिला जात आहे तरी अश्या अवैध्यरित्या चालणारया धंद्यावरती आपल्या कार्यालयाकडून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नसून आपल्या कार्यालयाचा व आपला धाक नसून हे धंदे मोकाट स्थिती मध्ये दिसून येत आहे तरी आपण लक्ष देऊन त्या अवैध्यरित्या चालविणाऱ्या व्यवसाय धारकांवरती आपणाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महा राज्य या संस्थेचे मा. जिल्हाध्यक्ष योगेश कुलथे यांनी निवेदनात म्हटले आहे .
