कामगार नेते रविश रासकर यांचे नवनागापुर MIDC कार्यालय येथे उपोषण
कामगार नेते रविश रासकर यांचे नवनागापुर MIDC कार्यालय येथे उपोषण
प्रतिनीधी – प्रतिक शेळके / सुपा .
सुपा जुनी व सुपा फेज २ एमआयडीसी अंतर्गत निकृष्ट रस्त्यांचे काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकावे व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी त्यासाठी रविश रासकर व सहकाऱ्यांचा आज MIDC कार्यालय नवनागापूर ऑफीस समोर उपोषणाचा बसल्याचा पहिला दिवस.
अधिकारी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले होते. पण एमआयडीसी मधील रस्त्याची काम करणाऱ्या ठेकेदाराला काळया यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करते ठाम राहणार असे सांगितले.
अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याकारणाने ठेकेदारावर कुठलीही कारवाई होत नाही. त्यामुळे ठेकेदाराला काळया यादीत टाकून त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण करते उपोषणावर ठाम राहणार.
कामगार नेते रविश रासकर यांच्यासोबत उपोषणाला प्रवीण दळवी, तेजस गायकवाड ,यश मिसाळ, दादा शेळके, नगरचे संकेत गुंजाळ व त्यांचे सहकारी उपस्थित आहेत.
