यंदा नवरात्रीतील कधी घट उठवणे, अखंड दिवा हालवणे व उपवास सोडणे – संजय काका कुलकर्णी
यंदा नवरात्रीतील कधी घट उठवणे, अखंड दिवा हालवणे व उपवास सोडणे – संजय काका कुलकर्णी
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
नवरात्रीत घटस्थापना करून अखंड दिवा ठेवला जातो. हा घट व अखंड दिवा दशमीला (विजयादशमी/दसरा) उठवणे (विसर्जन) व उपवासाचे उत्थापन करणे परंपरेने आवश्यक मानले गेले आहे.
सामान्य नियम
नवरात्र संपल्यावर म्हणजे दशमीच्या दिवशी घट विसर्जन, अखंड दिवा हलवावे व उपवास सोडणे हा विधी होतो.
नवमीला कन्या पूजन केले जात असले तरी उपवास व घट विसर्जनाचा विधी दशमीलाच केला जातो.
यंदा (२०२५ मध्ये) विशेष बदल
यंदाच्या नवरात्र तिथींमध्ये तृतीया वृद्धी तिथी असल्यामुळे संपूर्ण तिथी गणना बदलली आहे.
त्यामुळे पारंपरिक पद्धतीनुसार उपवासाचे उत्थापन व घट विसर्जन गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी करणे योग्य ठरेल.
म्हणजेच, यंदा नवरात्रीतील घट उठवणे, अखंड दिवा हालवणे व उपवास सोडणे हे सर्व विधी २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीला केले जातील.
स्रोत : –
श्री.संजय (काका ) पोपट कुलकर्णी
संपर्क – 9850262368
मु .पो. येळपणे , तालुका – श्रीगोंदा , जिल्हा – अहिल्यानगर .
