गौरी शुगर च्या संचालिका रेखा बोत्रे महिला आयकॉन पुरस्कार गौरी शुगर च्या संचालिका रेखा बोत्रे महिला आयकॉन पुरस्कार
गौरी शुगर च्या संचालिका रेखा बोत्रे महिला आयकॉन पुरस्कार
गौरी शुगर च्या संचालिका रेखा बोत्रे महिला आयकॉन पुरस्कार
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रेपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिरडगाव ता श्रीगोंदा येथील गौरी शुगर अॅण्ड डिस्टिलरीज या शुगर प्रकल्पाने आडचणीतून भरारी घेतली त्याबद्दल भारतीय साखर उद्योगाने गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रेपाटील यांनी महिला आयकाॅन पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या एका शानदार सोहळ्यात नॅशनल फेडरेशन को. शुगर चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे सचिव संग्रामसिंह शिंदे, उपाध्यक्ष डी. एम. रासकर सदस्य रणवीरसिंह शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गौरी शुगरच्या संचालिका रेखा बाबुराव बोत्रेपाटील यांनी कारखाना कामकाजात वेळ देऊन व कारखान्यात आमुलाग्र बदल घडवुन आणले. त्यांच्या या प्रयत्नातुन कारखान्याने गाळप हंगाम २०२३-२४ व गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये उच्चांकी गाळप केले. आणि ऊसाला उच्चांकी बाजारभाव ऊस तोडणी वाहतुकदार कामगारांना न्याय दिला त्याबद्दल हा गौरव करण्यात आला. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर रोहीदास यादव, गौरी शुगर चे खातेप्रमुख भास्कर काकडे योगेश राऊत प्रल्हाद मोढवे संदीप जाधव नवनाथ देवकर विकास क्षिरसागर समीर जकाते शशीकांत चकोर दौडकर ज्योतीराम रोडे प्रमोद ननवरे अजित शेळके रामलिंग खांडेकर राजेंद्र वाळके सुनील खेडकर नितीन दरेकर संभाजी चव्हाण सचीन गावडे उपस्थित होते. .
