ताज्या घडामोडी

सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पारनेर/प्रतिनिधी : सुदाम दरेकर :-

पारनेर तालुक्यातील सुपा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 200 हून अधिक जणांनी रक्तदान केले. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिबिराला पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, भाजप जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजप महिला जिल्हाध्यक्ष अश्विनीताई थोरात, दत्ता नाना पवार, सागर मैड सरपंच मनोज मुंगसे, नगरसेवक . युवराज पठारे, , सरपंच लहू भालेकर, मंगलताई मगर सुनिल थोरात डॉ. अजय येणारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी रक्तदात्यांचे अभिनंदन करत अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

रक्तदान करणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे गरजूंना जीवदान मिळू शकते. रक्त हा असा घटक आहे, जो कोणताही माणूस स्वतः बनवू शकत नाही आणि तो नैसर्गिकरित्याच तयार होतो. त्यामुळे, रक्ताची गरज असलेल्या व्यक्तींसाठी रक्तदान करणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे-राहुल पाटील शिंदे.

राहुल पाटील शिंदे यांनी रक्तदानाच्या महत्त्वावर प्रकाश टाकताना सर्व रक्तदात्यांचे आभार मानले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!