शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रूपेश ढवण यांचे दि . २८ ला निघोजला अन्न त्याग आंदोलन .
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रूपेश ढवण यांचे दि . २८ ला निघोजला अन्न त्याग आंदोलन .
निघोज :- प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
कांदा भाववाढ व इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तोडगा काढावा , अन्यथा सोमवार दि . २८ रोजी निघोज येथे अन्न त्याग करण्याचा इशारा आपली माती , आपली माणसं या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांनी निवेदनाव्दारे दिला आहे .
सामाजिक कार्यकर्ते ढवण पुढे म्हणतात की , कष्टकरी शेतकऱ्यांनी घामातून पिकवलेल्या कांद्याला कमीत कमी किलोला ३५ ते ४० रुपये भाव मिळावा , केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी हटवून निर्यात धोरण चालू करावे , जेणेकरून कांदयाला भाव वाढ मिळेल व शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे ज्यादा पडतील , शेतकऱ्यां नी पिकविलेल्या सर्व शेती मालाला योग्य तो हमी भाव द्यावा , ज्यामुळे शेती मालाचे भाव पडणार नाही . सरकारने नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा , सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीत सापडला आहे , सरकारने विधानसभा निवडणुकीत जाहिरनाम्यात घोषीत केलेल्या कर्ज माफीचा निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा , या शेतकऱ्यां प्रती असणाऱ्या मागण्यांसंदर्भात रुपेश ढवण , महेंद्र पांढरकर व शेतकरी येत्या सोमवार दि . २८ रोजी सकाळी १० वाजता निघोज बसस्थानक परिसरात अन्न त्याग आंदोलन करणार आहेत .
राज्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या असून कांदा हे कमी कालावधीत मोठे उत्पादन देणारे नगदी पिक असून कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना कांदा बी , रोप तयार करणे , शेताची नांगरट , पाळी , वाफे तयार करणे , कांदा लागवड , कांदयाला खते , औषधे टाकणे , वीज उपलब्ध असेल , त्यावेळेस रात्रीच्या वेळी जीव धोक्यात घालून पाणी भरणे , खुरपणी , कांदा काढणी एवढे सोपस्कार पार पाडून कांदा पिक पदरात पडल्यावर ते पुन्हा कांदा चाळीत साठवणे व भाव वाढ झाल्यावर ते विकणे किंवा भाव न मिळाल्यास त्याची विल्हेवाट लावणे , एवढे द्रविड प्राणायम शेतकऱ्या ला करावे लागते , तेवढे कुठे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतात , याची सर्वच जाणीव असल्याने रुपेश ढवण व शेतकऱ्यांनी एकजूट केली असून हे जण आंदोलन उभे राहत आहे . याला नजिकच्या काळात मोठ्या जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त होणार आहे .
