सौ राणीताई निलेश लंके यांच्या निघोज जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ मळगंगा माता चरणी नारळ वाढवून करण्यात आला
सौ राणीताई निलेश लंके यांच्या निघोज जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ मळगंगा माता चरणी नारळ वाढवून करण्यात आला.
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
यावेळी हजारोच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन पारनेर अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी चे उमेदवार सौ. राणीताई निलेश लंके सह दक्षिण अहिल्यानगर चे खासदार निलेश लंके यांना देऊन त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात त्याचा उल्लेख करावा व त्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासंदर्भात खासदार डॉक्टर निलेश लंके यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे साहेब यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी पदयात्रा काढत पत्रकारांच्या मागण्यासाठी मंत्रालयात निवेदन दिलेले आहे. त्यामधील काही मागण्या मान्य केल्या असून काही प्रलंबित आहेत. प्रत्येक पत्रकार एक मतांचा गठ्ठा असून हजारो जनसंपर्क पत्रकारांच्या भोवती असतो त्यामुळे पत्रकारांच्या मागण्या जो उमेदवार प्रकर्षाने मांडेल आणि त्या मिळून देण्यासाठी प्रयत्न करेल त्यांच्या पाठीशी पत्रकार नक्कीच सहकार्य करेल असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव विश्वासराव आरोटे यांनी केले आहे. पत्रकारांच्या दोन मागण्या पूर्ण झाल्या असून 22 मागण्या प्रलंबित आहेत तरी त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे त्याला बळकट करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन अहिल्यानगर सचिव सुरेश खोसे पाटील यांनी परिसरातील उमेदवारांना केलेले आहे. पारनेर तालुक्यातील सर्व उमेदवार पत्रकारांच्या मुद्द्यासाठी सहकार्य करतील, जो उमेदवार पत्रकार बांधवांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल जाहीरनाम्यात उल्लेख करेल त्यांना पत्रकारांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका सहसचिव ॲड. सोमनाथ मच्छिंद्र गोपाळे यांनी केले आहे. यावेळी खासदार निलेश यांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्या नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका सहसचिव ॲड. सोमनाथ मच्छिंद्र गोपाळे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव पवार, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जेष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे निघोज शहराध्यक्ष सचिन राव जाधव, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य ठकाराम गायखे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य,संतपंढरी न्युज प्रतिनिधी रामचंद्र सुपेकर सर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य दिपकराव वरखडे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ कार्यकारणी सदस्य संपतराव वैरागर, जगदाळे व इतर पत्रकार बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
