ताज्या घडामोडी

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचालित WIWA महिला सक्षमीकरण कार्यक्मांतर्गत आज पळवे बुद्रुक येथे आदिनाथ महिला ग्रामासंघा तील महिलांची नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन

प्रथम एज्युकेशन फाउंडेशन संचालित WIWA महिला सक्षमीकरण कार्यक्मांतर्गत आज पळवे बुद्रुक येथे आदिनाथ महिला ग्रामासंघा तील महिलांची नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-

या कार्यशाळेला ३५ शेतकरी महिलांनी उपस्थीती दर्शविली.कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व शेतकरी महिलांचे हळदी कुंकु लावून स्वागत कऱण्यात आले. बचत गट सीआरपी मंगल पळसकर यांनी कार्यशाळेचा उद्देश आणि महत्व याविषयी माहिती दिली.त्यांनतर महिलांना मेंटोर लीडर प्रमिला हिवाळे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन कामरगाव येथे सुरू असणाऱ्या व्यवसायिक प्रशिक्षण कोर्स बद्दल तसेच कृषि वानिकी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली.शेतकरी मार्गदर्शक शिवाजी व्हसाळे यानी परसबाग, अन्नवन आणि नर्सरी बद्दल मार्गदर्शन केले. तसेच नैसर्गिक शेती विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व महिलाना शेवगा, पपई आणि पेरू ची रोपे देण्यात आली.या कार्यक्रमासाठी WIWA मेंटोर प्रणिता काटकर यांनी मेहनत घेतली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पळवे बुद्रुक मधील स्टाफ पळवे बुद्रुक गावच्या मा.सरपंच ऋतुजाताई जाधव उपस्थित होते आदिनाथ ग्राम संघाच्या सचिव मीनाताई जाधव, शीलाताई कळमकर, विद्याताई जाधव, मंगल शिंदे, गीतांजली पवार, सीमाताई जाधव, रुकसाना तांबोळी, मनीषा कळमकर गीतांजली पळसकर सीआरपी मंगल परसकर इत्यादी सदस्य हजर होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!