सुपा एमआयडीसी मधील रस्त्यावरील अवैद्य पार्किंग हटवण्यासाठी रविश रासकर यांनी केलेल्या उपोषणाला यश… पोलीस निरीक्षक यांच्या लेखी आश्वासनानंतर आणि केलेल्या कारवाईचे पत्रामुळे उपोषण स्थगित…
सुपा एमआयडीसी मधील रस्त्यावरील अवैद्य पार्किंग हटवण्यासाठी रविश रासकर यांनी केलेल्या उपोषणाला यश…
पोलीस निरीक्षक यांच्या लेखी आश्वासनानंतर आणि केलेल्या कारवाईचे पत्रामुळे उपोषण स्थगित…
प्रतिनिधी / प्रतिक शेळके :-
रविष रासकर यांनी सुपा जुनी एमआयडीसी आणि सुपा फेज २ एमआयडीसी मधील होत असलेल्या अवैध रस्त्यावरील होत असलेल्या अवैद्य पार्किंगमुळे येणाऱ्या जाणाऱ्या कामगारांना, प्रवाशांचे वारंवार अपघात होतात. त्यामुळे रविश रासकर यांनी जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी कार्यालय अहिल्यानगर, उपअभियता बांधकाम सापत्य विभाग नवनागापूर यांना वारंवार पत्रव्यवहार केला होता. तरीही अवैद्य पार्किंगवर कुठलीही कारवाई होत नसल्याकारणाने रविश रासकर यांनी उपोषणाचा पवित्रा घेतला. आणि सुपा पोलिसांनी अवैद्य पार्किंगवर कारवाई चालू केली. पण त्या गाड्या रस्त्यावर कायमस्वरूपी पार्किंग करत असल्यामुळे कामगारांची अपघात वारंवार होतात त्यामुळे रस्त्यावरची पार्किंग कायमस्वरूपी बंद होऊन ती प्रत्येक कंपनीची पार्किंग प्रत्येक कंपनीमध्ये व्हावी . आणि कुठेतरी जागा घेऊन त्यांची पार्किंग ची सोय करावी.रविश रासकर यांनी सुपा पोलीस स्टेशनच्या समोर उपोषण पुकारले होते. आणि ते काल 16 जुन 2025 रोजी सकाळी उपोषणाला बसले आणि त्यानंतर उपोषणावर पोलिस पोलिस निरीक्षक साहेबांनी रात्री लेखी आश्वासन देऊन केलेल्या कारवाईचे पत्र दिले. व केलेल्या कारवाईचे पत्र दिल्यामुळे उपोषण स्थगित करण्यात आले. कारवाईसाठी थोडा अवधी मागितला.
रविश रासकर यांचे उपोषण पोलीस निरीक्षक दिवटे साहेब यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी पो हे कॉ अमोल धामणे , मनसे नेते अविनाश पवार.प्रवीण दळवी, सरदार शेख आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
