गव्हाणवाडी येथील एका महिन्यातच रस्त्याची झाली दुर्दशा
एका महिन्यातच रस्त्याची झाली दुर्दशा
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील नगर पुणे महामार्ग लगत असणाऱ्या गव्हाणवाडी येथील महामार्ग ते सोनलकर वस्ती रस्ता असा दिड किलोमीटर पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागा च्या विशेष दुरुस्ती अंतर्गत अंदाजे ६० लक्ष रुपये खर्च करून झालेला डांबरीकरण रस्त्याचे काम एका महिन्यापूर्वी पूर्ण झाले होते त्या रस्त्याचे एक महिन्यामध्येच डांबर ,खडी निघत आसुन खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. ६० लक्ष रुपये खर्चून डांबरीकरण झाले आहे परंतु अजून साईट पट्टया व दिशादर्शक फलक हे काम बाकी आहे.सध्या गव्हाणवाडी ते बेलवंडी श्रीगोंदा रस्त्याचे सिमेंट काँक्रेट रस्ता काम चालू आहे त्यामुळे प्रवासी पर्यायी रस्ता म्हणून या रस्त्याचा वापर करत आहेत तसेच सावंतवाडी ते सोनलकर वस्ती पर्यंत ४ किलो मिटर रस्त्याचे काम निधीअभावी बाकी आहे.त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.या रस्त्याची तातडीने नवीन रसत्याची दुरुस्ती व उर्वरित रस्त्याचे काम प्रशासन करावे अन्यथा आम्हाला कायदेशीर मार्गाने आंदोलन करावा लागेल असा इशारा गव्हाणवाडी सरपंच संदिप गायकवाड यांनी दिला आहे.
