निंबवी ग्रामस्थांचे प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच. निंबवी येथील वेंको बॉयलर चे काम थांबवावे : सरपंच काका शिर्के
निंबवी ग्रामस्थांचे प्रदूषण नियंत्रण मंडळासमोर दुसऱ्या दिवशी उपोषण सुरूच.
निंबवी येथील वेंको बॉयलर चे काम थांबवावे : सरपंच काका शिर्के
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील निंबवी गावातील वेंकों बॉयलर रिसर्च अँड ब्रिडींग फार्म प्रा.लि. च्या शेडचे बांधकाम थांबविणे, व मेलेल्या कोंबड्याची व घाणीच्या दुर्गंधीने हैराण झालेली निबंवी ग्रामस्थांनी मागील महिन्यापूर्वी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर महिलांसह ग्रामस्थांनी उपोषण केले होते यावेळी मा.आमदार राहुल जगताप यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन रस्ता रोको करू अशी आश्वासनही दिली होती ,तसेच मा.मंत्री बबनराव पाचपुते यांनी मध्यस्थी केली होती परंतु कंपनीचे काम चालूच राहीले .यावेळी तहसीलदार व गट
विकास अधिकारी यांनी आश्वासनाची लेखी पत्र देऊन उपोषण सोडले होते परंतु कार्यवाही काही झाली नाही.नाईलाजास्तव सरपंच काका शिर्के यांच्या नेतृत्वाखाली निबंवी ग्रामस्थांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर यांच्या कार्यालयासमोर सोमवार दि. २ जुन २०२५ आमरण उपोषण सुरू केले आहे.
सविस्तर वृत्त असे की परवाण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून चालू केलेला वेंको रिसर्च
अॅण्ड ब्रिडिंग फार्म प्रा. लि. निंबवी हा प्रदुषणकारीहा पोल्ट्री व्यवसाय सुरु करण्यासाठी निंबवी गावात दि.५ जानेवारी २००८ रोजी कोणतीही अधिकृत ग्रामसभा घेण्यात आली नव्हती व या पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कोणताही अधिकृत ठराव मांडण्यात आला नव्हता व तशी
कोणतीही नोंद निंबवी ग्रामपंचायत यांच्या दफ्तरी नाही त्यामुळे या पोल्ट्री व्यवसायास निंबवी ग्रामपंचायत यांची अधिकृत परवानगी नाही.तसेच पोल्ट्री व्यवसाय व्यवस्थापनाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना सादर केलेले निंबवी ग्रामपंचायत यांचे ना-हरकत प्रमाणपत्र अधिकृत नसतानाही व कसलेही कागदपत्र नसताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या पोल्ट्री व्यवसायास
परवानगी कशी दिली ? महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने पोल्ट्री व्यवसायास परवाना दिलेला गट नंबर ५१७ / १ निबंवी ग्रामपंचायत हद्दीत अस्तित्वात नाही तरी गेली १७ वर्षे याच गट नंबरवर हा पोल्ट्री व्यवसाय कसा चालू आहे.चालू असलेला पोल्ट्री व्यवसाय रहिवाशी वस्ती पासून ३८० मीटरच्या आत आहे. या पोल्ट्री व्यवसायाने २००८ पासून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या प्रदूषण विषयक नियमावलीचे पालन केले नाही तरी पण गेली १७ वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी या पोल्ट्री
व्यवसायावर कारवाई का केली नाही असा सवाल निबंवी ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. हा पोल्ट्री व्यवसाय कम्पोस्टिंग प्रक्रिया न करता सुरु आहे. मृत पक्षी उघड्यावर फेकले किंवा जाळले जातात. एवढच नाही तर रसायनयुक्त पाणी ओढ्या नाल्याने
मोकळ्यावर सोडले जाते. ३३% ग्रीन कव्हरेज नाही. केंद्रीय भूजल प्राधिकरण यांची परवानगी न घेता या पोल्ट्री व्यवसायाने परिसरात १०००
ते १५०० फुट खोलीवर ४० ते ५० बोअरवेल खोदले आहेत. निंबवी ग्रामपंचायत,आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचे परवाने न घेता आज रोजी नवीन १२ शेड चे बांधकाम सुरू करून या पोल्ट्री व्यवसायाने वातावरणात जाणीवपूर्वक प्रदुषणाची समस्या निर्माण करुन ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण केला जात आहे त्यामुळे या पोल्ट्री व्यवसायाच्या संचालक मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तहसिलदार श्रीगोंदा यांचा दि. ९ एप्रिल २०१५ रोजी बांधकामास मनाई हुकुम असतानाही सध्या काम चालू आहे. सदर वाढीव बांधकामाची पाहणी करुन तहसिलदार श्रीगोंदा यांचे आदेश मोडल्या प्रकरणी या पोल्ट्री व्यवसायावर कठोर कारवाई करावी. या पोल्ट्री व्यवसायाने गेली १७ वर्षे बनावट कागदपत्रे सादर करुन, परवाने घेऊन आपला पोल्ट्री व्यवसाय सुरू करून शासनाची फसवणुक केल्या प्रकरणी या पोल्ट्री व्यवसायाची कसून चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी. अशा विविध मागण्या अंनंदा गावडे सह मोठ्या संख्येने उपस्थित असलेले महिला व ग्रामस्थांनी केला आहे.
