नारायणगव्हाण च्या सेवा संस्थेला जिल्हा बँकेच्या संचालिका शेळके यांनी दिली भेट , केले समाधान व्यक्त
नारायणगव्हाण च्या सेवा संस्थेला जिल्हा बँकेच्या संचालिका शेळके यांनी दिली भेट , केले समाधान व्यक्त .
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांनी पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण सेवा संस्थेला सदिच्छा भेट दिली .
यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका गितांजली शेळके यांनी नारायण गव्हाण येथील शेतकरी व सेवा संस्थेच्या संचालकांना मार्गदर्शन करताना जिल्हा बँकेने तरुणांसाठी विविध योजना सुरू केलेल्या असल्याची माहिती दिली व नारायण गव्हाण सेवा संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून , त्या पुढे म्हणाल्या की , सेवा संस्थांनी विविध उपक्रम सुरु करून संस्थेने आर्थिक गरजा भागविण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवावे , त्यास जिल्हा बँक सर्वोत्परी सहकार्य करेल ,असे ही शेळके म्हणाल्या .
याप्रसंगी संस्थांच्या वतीने संचालिका शेळके यांचा सत्कार करण्यात आला , त्याप्रसंगी पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुरेशराव बोरुडे, सेवा संस्थेचे चेअरमन काशिनाथ नवले, बाळासाहेब चव्हाण,शंकरराव कांडेकर , माणिकराव शेळके, गणेश शेळके, विकास अधिकारी प्रभाकर लाळगे , अधिकारी भालेकर ,बंडोपंत नाईक,मधुकर पठारे,राजू शेळके, आणि इतर उपस्थित होते .
