पत्रकार स्नेहा बारवेंच्या हल्लेखोरांवर कारवाई करावी..पारनेरमधील पत्रकारांची मागणी..
पत्रकार स्नेहा बारवेंच्या हल्लेखोरांवर कारवाई करावी..पारनेरमधील पत्रकारांची मागणी..
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-
पत्रकार स्नेहा बारवे आणि पत्रकार समीर राजे यांच्यावर गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे निषेधार्थ पारनेर तालुक्यातील पत्रकारांनी पारनेर पोलीस स्टेशनला जावुन पोलीस निरिक्षक समीर बारवकर यांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली. यापूर्वीसध्दा अनेकदा पत्रकारांवर हल्ले झालेले आहेत.पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला असुन,अशा हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी यावेळी बोलताना केली.
पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांनी केली.तर, पत्रकारांवर असे हल्ले वारंवार होत असतील तर,सर्वसामान्य जनतेचे कसे होणार,त्यांना न्याय कोण देणार..? असा प्रश्न पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उणवणे यांनी केला.यावेळी पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनेची वरीष्ठ पातळीवर चौकशी होईलच, पूढील कारवाईसाठी निवेदन पाठवत असल्याचे सांगीतले.
समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे व कार्यकारी संपादक समीर राजे यांना मंचर येथील राजकीय पुढार्याने नातेवाईकां सह येत धक्काबुक्की, अश्लील शिविगाळ,मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली.या घटनेमुळे जिल्ह्यामधे एकच खळबळ उडाली असुन,आपण सध्या बिहारमधे आहोत का असाच प्रश्न निर्माण होतोय.या गावगुंडाचा पोलीसांनी बंदोबस्त करावा आणि त्यांना कडक शिक्षा व्हावी अशी मागणीसुध्दा पत्रकार संघटनांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.
बारवे आणि राजे यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांवर कारवाई करावी अशी अहमदनगर जिल्हा व पारनेर तालुक्यातील पत्रकारांचे वतीने मागणी केली.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे,राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ता उणवणे,राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका प्रसिध्दी प्रमुख श्रीनिवास शिंदे,राज्य पत्रकार संघाचे पारनेर तालुका खजिनदार नितीन परंडवाल,जेष्ठ पत्रकार संतोष सोबले,भगवान गायकवाड,प्रेस फोटोग्राफर जयेश हरेल आदीसह पत्रकार बांधव उपस्थित होते.
पारनेर पोलीस स्टेशनला पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांच्यावर हल्ला करणार्यांवर कडक कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन देताना राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे,राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड, तालुकाध्यक्ष बाबाजी वाघमारे,जेष्ठ पत्रकार दत्ता उणवणे व पत्रकार बांधव
