शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरून दोन बिबट्यांनी पाळीव कुत्र्याचा पाडला फडश्या !
शेतकऱ्याच्या डोळ्यासमोरून दोन बिबट्यांनी पाळीव कुत्र्याचा पाडला फडश्या !
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव येथे वाळुंज मळा येथील लक्ष्मण वाळूंज यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याला दोन बिबट्यांनी हल्ला करून फरफटक नेत त्या पाळीव कुत्र्याचा फडशा पडला.ही घटना १७ एप्रिल रोजी मध्यरात्री घडली आवाज येताच घरातील व वस्तीवरील लोक जागे झाले त्यावेळेस त्यांनी दोन बिबट्यांनी कुत्र्यावर हल्ला केल्याचे दिसले व त्यांच्या डोळ्यासमोरून कुत्र्याला फरपटत नेले . सकाळी घरातील लोकांनी कुत्र्याचा शोध घेतल्यास शेताच्या बाजूला कुत्र्याचा बिबट्यांनी अर्था भाग खाल्लेला निदर्शनास आला त्यावेळी त्यांनी ही घटना वन कर्मचारी यांच्या कानावर घातली व ग्रामस्थांच्या वतीने या परिसरामध्ये पिंजरा लावण्याचे पत्र ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले असून दोन दिवसात पिंजरा लावणार आहे असे सांगण्यात आले आहे. अनेक दिवसापासून या भागामध्ये बिबट्यांचा वावर होत आहेत यापूर्वीही या भागामध्ये दिवसा दोन शेळ्या खाल्ल्या होत्या तसेच अनेक वाड्या वसत्यांवरील शेतकऱ्यांच्या पाळीव कुत्रे व गाई शेळ्या यांच्यावर बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत .
