ताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल पळवे बुद्रुक मधील इयत्ता चौथीचा शालेय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला

जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल पळवे बुद्रुक मधील इयत्ता चौथीचा शालेय विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला 

प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-

पळवे बुद्रुक येथील जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेतील
चौथीच्या मुलांना तिसरीच्या मुलांनी निरोप दिला .सदरील निरोप समारंभासाठी पळवे गावचे आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य, सेवा सोसायटी आजी माजी चेअरमन व्हा. चेअरमन सर्व संचालक, सर्व सन्माननीय पालक व माता ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की शाळेच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकवले त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही . विद्यार्थ्यांनी नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास करून स्वतःचे तसेच शाळेचे नाव व आई-वडिलांचे नाव उज्वल करावे असे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन पर भाषणे झाली सर्वांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .
चौथीच्या विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा शाळेला भेट देण्यात आली व इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊचे वाटप करण्यात आले.
तसेच मंथन लक्षवेध मिशन आरंभ या स्पर्धा परीक्षेमध्ये बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले . सर्व शिक्षक वृंद यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन व चांगले परिश्रम घेतल्यामुळे शाळेचा निकाल खूप चांगला लागला यामुळे शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना अल्पोपहार देण्यात आला. उपस्थित सर्वच मान्यवरांचे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!