ताज्या घडामोडी

पारनेर तालुक्यातील अवैंधरित्या चालविल्या जाणारऱ्या लॅब वर मनसे टाकणार हातोडा

पारनेर तालुक्यातील अवैंधरित्या चालविल्या जाणारऱ्या लॅब वर मनसे टाकणार हातोडा

सुपा प्रतिनिधी /प्रतिक शेळके-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे माथाडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी अहिल्या- नगर जिल्हा आरोग्य अधिकारी नागरगोजे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की पारनेर तालुक्यात परवाना धारक लॅब किती आहेत व विना परवाना अवैंधरीत्या चालविल्या जाणारऱ्या लॅब किती आहेत तसेच पारनेर तालुक्यातील जनतेच्या जीवाशी टेस्ट च्या‌ नावाने खेळ मांडला जात आहे हे दुर्दैवी आहे पारनेर तालुक्यातील लॅब धारकांनी आपली स्वतःची ओळख, नावासह शिक्षण, तपशिल बोर्ड, तसेच विविध चाचण्या संदर्भात नियमावली फलक कोणत्याही लॅब मध्ये लावण्यात आले नाहीत तसेच किरकोळ आजारी असताना गरज नसताना सुद्धां वेगवेगळ्या चाचण्यांच्या नावाने लोकांकडून अव्वा चे सव्वा पैसे घेऊन लुट करीत आहेत तसेच लॅब मध्ये लेडीज आणि पुरुषांसाठी बाथरुम सह आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध नसताना सुद्धां लॅब च्या नावाने पारनेर तालुक्यात आरोग्य अधिकारी यांच्या कृपा आशिर्वादाने गोरख धंदा जोरदार चालू असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे तसेच दिवसेंदिवस यात वाढ होत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे परवाना धारक लॅब मध्ये विविध चाचण्या (टेस्ट) संदर्भात नियमावली फलक लावण्याचे बंधनकारक करण्यात यावे जे लॅब चालक नियमावली चे पालन करणार नाही त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा तसेच विना परवाना अवैंधरीत्या चालविल्या जाणारऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅब वर त्वरित गुन्हा दाखल करुन बंद कराव्यात जर आरोग्य अधिकारी यांनी यांची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि आठ दिवसांत कारवाई चा लिखीत स्वरुपात खुलासा केला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तालुक्यातील अवैंधरित्या चालविल्या जाणारऱ्या लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या लॅब वर मनसे स्टाईल दनका दिला जाईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यास पुर्ण पणे जिल्हा आरोग्य अधिकारी अहिल्या- नगर ,पारनेर तालुका आरोग्य अधिकारी जिम्मेदार राहिल असा इशारा मनसे माथाडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

जिम्मेदार आरोग्य अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्य करणं दुर्दैवी

कोणीही लॅब टाकूशकत कोणी कितीही पैसे घेऊ शकतो याबाबत काहीही नियम अटी नाहीत एका जिम्मेदार आरोग्य अधिकाऱ्यांनी बेजबाबदार वक्तव्य करणं दुर्दैवी आहे त्यामुळे अधिकारिच अवैंधरित्या चालु असलेल्या लॅब टोळीच्या मलिद्यातील वाट्याला सहभागी आहेत की काय असा प्रश्न पडला आहे त्यामुळे लवकरच आरोग्य मंत्री यांना भेटून याबाबत माहिती देणार – मनसे नेते अविनाश पवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!