ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व अध्यात्माचे उपासक ह.भ.प मारुती सोनुळे महाराज यांचे निधन
ज्ञानेश्वरीचे अभ्यासक व अध्यात्माचे उपासक ह.भ.प मारुती सोनुळे महाराज यांचे निधन
प्रतिनिधी – प्रतीक शेळके सुपा
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली चे रहिवासी ह.भ.प.गुरुवर्य मारुती सावळेराम सोनुळे ( माऊली बाबा ) यांचे आज दुपारी १२:३० वा. निधन झाले झाले. विश्वाची माऊली आसणारे ज्ञानेश्वर महाराज लिखीत संपूर्ण ज्ञानेश्वरी तोंडपाठ असणारे व आयुष्यभर ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार करत अखंडित ज्ञानदान करनारे अध्यात्माचे अभ्यासक परमार्थिक भूषण ह.भ.प.गुरुवर्य मारुती सावळेराम सोनुळे ( माऊली बाबा ) आसी त्यांची ओळख होती. ते पूर्वश्रमीच्या घोंगडीच्या व्यवसायाच्या माध्यमातून संपूर्ण तालुकाभर प्रचलीत होते. मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक परिवार त्यांनी निर्माण केला होता. संत रूपाला पोहोचलेल्या माऊली महाराज यांनी आपले संपूर्ण जीवन हे कष्टमय व संघर्षात घालविले .तालुक्यातील अनेक जागृत देवस्थानांच्या सुशोभीकरणासाठी किंवा मंदिर उभारणीसाठी नेहमीच मोलाचे योगदान असणाऱ्या माऊली बाबा यांनी वडनेर येथे एक विशाल मंदिराची उभारणी केली आहे .अध्यात्मिक ध्येयवेडे आसनाऱ्या या माऊली बाबांनी मंदिराच्या सर्व भिंती या संगमरवरी दगडात उभ्या करायच्या व त्यावर संपूर्ण ज्ञानेश्वरी लिखाण करायचे हा मानस ठेवून हे मंदिर उभारले त्यात बऱ्यापैकी त्यांचा हा मानस पूर्णत्वासही गेला आहे .गेले अनेक दशके संपूर्ण देशभरातून अनेक भक्तगण त्यांच्या दर्शनाला वडनेर या ठिकाणी येत माऊली बाबांचे दर्शन व आध्यात्मिक सुखाचा लाभ घेत असे .
