आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हिवाळी अधिवेशनात बिबट्या विषयी सर्वांचे लक्ष वेधले
आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी हिवाळी अधिवेशनात बिबट्या विषयी सर्वांचे लक्ष वेधले
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
अलीकडे श्रीगोंदा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याची संख्या वाढली आहे व त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाळीव प्राणी व शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे हल्ले होत आहे त्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांवर बिबट्याने हल्ले केले होते तसेच रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी देण्यासाठी जावे लागते व त्यावेळेस शेतकऱ्यांवर बिबट्याचे हल्ले होताना दिसत आहे त्यावर उपाय म्हणून शासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करावा यासाठी श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदारसंघाचे श्रीगोंदा तालुक्यातील वाढत्या शेतकऱ्यांवर बिबट्या हल्ल्याप्रकरणी विधिमंडळात ज्वलंतप्रश्न मांडले तसेच रात्रीच्या वेळी शेती साठी लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेती मध्ये पाणी द्यावे लागते त्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट द्यावी असेही आमदार श्री विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांनी विधिमंडळात मुद्दे मांडले .त्यांनी हे मुद्दे मांडल्यामुळे शेतकऱ्यांमधून आमदार विक्रम पाचपुते यांचे कौतुक होत आहे .
