बेलवंडी येथील महावितरणच्या कार्यालयाला शेतकरी ठोकणार टाळे
बेलवंडी येथील महावितरणच्या कार्यालयाला शेतकरी ठोकणार टाळे
श्रीगोंदा तालुक्यामध्ये पिंप्री कोलंदर सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांमध्ये सध्या ठरलेल्या आठवड्यांमध्ये लाईट न देता दिवसाआड लाईट देण्याचे महावितरणने आजबच नियमावली व वेळाकपत्र तयार केले आहे त्यामुळे शेतकरी अक्षरशा रडकुंडीला आला आहे .प्रत्येक आठवड्यामध्ये आठ तासांमध्ये आठ दिवस लाईट देण्याचे महावितरण चे वेळापत्रक आहे .परंतु काही महिन्यांपासून पिंप्री कोलंदर सब स्टेशन आठवड्यामध्ये आठ तास आठ दिवस लाईट न देता ती लाईट कोणत्याच गावातील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता दिवसाआड लाईट चालू केली आहे परंतु तीही लाईट पूर्ण आठ तास राहत नाही त्यातील तीन ते चार तास लाईट शेतकऱ्यांना भेटते त्यातूनही अनेक वेळा लाईटच्या झटक्यांचे चटके शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे . एकतर बिबट्यांच्या वाढत्या वावर व भितीने दिवसा लाईट द्या अशी शेतकऱ्यांची मागणी असून तशी लाईट न देता वेगवेगळ्या आठवड्यांमध्ये वेळ बदलून लाईट दिली जाते .
बेलवंडी व पिंप्री कोलंदर सब स्टेशन च्या महावितरण च्या कार्यालयाला 28 जानेवारी ला शेतकरी टाळे ठोकणार आहोत असे आशयाचे पत्र ढवळगाव, राजापुर , येवती, आरंणगाव दुमाला ,कोंडेगव्हाण या गावांनी लेखी पत्र बेलवंडी महावितरण उपविभागीय कार्यालय यांना दिले आहे .
पूर्ण क्षमतेने लाईट नाही भेटल्यास आम्ही टाळे बंद आंदोलन करणारच
आम्ही सर्व ढवळगाव व पंचक्रोशीतील ग्रामस्थ बेलवंडी महावितरण उपविभागीय कार्यालय यांना टाळे बंद आंदोलन चे लेखी पत्र सर्व ग्रामपंचायत ने दिले आहे शेतकऱ्यांना त्यासाठी वेळेवर व पूर्ण क्षमतेने लाईट नाही भेटल्यास आम्ही टाळे बंद आंदोलन करणारच – संतत्प शेतकरी गणेश ढवळे पाटील (मा.उपसरपंच ढवळगाव)
विषयी आमचे कर्मचारी काम करत आहे
प्रकृतीच्या कारणामुळे मी काही दिवस रजेवर आहे त्यामुळे सदरील विषय हा मला माहीत नाही त्या विषयी आमचे कर्मचारी काम करत आहे – एम.बी.सूर्यवंशी
( अभियंता बेलवंडी महावितरण उपविभागीय कार्यालय )
अडथळे आणणाऱ्या व्यक्ती विषयी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला
33 केव्ही पिंप्री कोलंदर या उपकेंद्रामध्ये सध्या ओव्हरलोडींग तसेच लो होल्टेजचे प्रॉब्लेम सुरू आहे.त्याकरिता वेगळ्या ३३ केव्ही विद्युत वाहिनी उभारणीचे काम महावितरण तर्फे युद्ध स्तरावर करण्यात येत आहे परंतु 2 शेतका रा.स्टेशन बेलवंडी यांनी अडविलेले आहे, जर ते 33 केव्ही चे काम पूर्ण झाले तर पिंपरी कोलंदर उपकेंद्र अंतर्गत पिंपरी, माठ, राजापूर, उक्कडगाव, येवती,वडगाव, म्हसे, कोंडेगव्हाण, अरणगाव दुमाला, ढवळगाव, रायगव्हाण, ह्या भागातील शेतीचा विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होईल तसेच लाईन मध्ये अडथळे आणणाऱ्या व्यक्ती विषयी पोलीस स्टेशन येथे तक्रारी अर्ज दिला आहे – शुशील तायडे (साह्यक अभियंता पिंप्री कोलंदर व प्रभारी अभियंता बेलवंडी )
माझ्या शेतीचे नुकसान टाळावे ,मी पण एक शेतकरी आहे
मि अल्प भुधारक आसुन माझ्या जमिनीमुधुन सर्व लाईटचे पोल जात आसुन काही पोल माझ्या शेताच्या बाजुणे व काही पोल दुसऱ्या बाजूने महावितरण ने घ्यावे व माझ्या शेतीचे नुकसान टाळावे अशी माझी कळकळीची विनंती आहे मी कसल्याही प्रकारची शेतकऱ्यांची व महावितरण ची अडवणूक करत नाही मी पण एक शेतकरी आहे त्यामुळे माझाही सर्वांनी विचार करावा – – – सोन्याबापु लबडे
( लाईट चे पोल लाईन आडवणारे संतप्त शेतकरी )
