पुढाऱ्यांना गाव बंदी करु, संतोष वाबळे. म्हसणे सुलतानपूर येथे कृति समितीची स्थापना.
पुढाऱ्यांना गाव बंदी करु, संतोष वाबळे.
म्हसणे सुलतानपूर येथे कृति समितीची स्थापना.
पारनेर प्रतिनिधी / – प्रतिक शेळके
पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना, कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. हा लढा बळकट करण्यासाठी गाव तिथे कृती समिती स्थापन करण्याचे अभियान सुरू आहे. याच निमित्ताने म्हसने सुलतानपूर या ठिकाणी कृती समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर यांनी पुढील दिशा कशी असणार याची माहिती दिली. तसेच सरपंच डॉक्टर विलास काळे यांनी मनोगत व्यक्त करताना ज्या ज्या वेळी पाण्याच्या प्रश्नावर समितीचा जो निर्णय असेल, त्यावेळी संपूर्ण गाव पाठीशी उभे करण्याचे आश्वासन ग्रामस्थांच्या वतीने दिले. संतोष वाबळे बोलताना म्हणाले वेळ पडल्यास पाण्याच्या मुद्द्यावर पुढाऱ्यांना गाव बंदीही करू असा इशाराही दिला. राजकीय जोडे बाजूला ठेवून आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन सुभाष करंजुले यांनी केले.
या वेळी मनोज तामखडे, अन्सार पटेल, अनिल सोबले, भास्कर गायकवाड, राहुल गुंड, अरूण बेलकर, रघुनाथ मांडगे,रामदास माने, शरद बालवे, प्रतीक शेळके, रवींद्र तरटे, बबन गुंड, पोपट तरटे सुभेदार, बाळासाहेब तांबे (मेजर), गोरख बागल, ग्रा.सदस्य अनिल तरटे, ग्रा.सदस्य नामदेव गुंड, ग्रा.सदस्य नितीन बागल, नामदेव गाडगे (मा. सैनिक संघटना अध्यक्ष), योगेश कुलथे (भ्रष्टाचार जन आंदोलन),शंकर तांबे, सौ. सुनिता तरटे, सौ.प्रीती गुंड, बबन गुंड,गोरक्षनाथ पठारे, बाळासाहेब गुंड, गणेश बागल, बाबासाहेब बागल, सुरेश गुंड, कैलास गुंड, नारायण पठारे, विकास गुंड, रमेश वाबळे, पोपट बालवे, मयूर गुंड, ऋषिकेश पठारे, अजित तरटे, किसन गुंड, रोहन पठारे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
