खंडाळे माथा येथे तिहेरी हत्याकांड महिलेसह दोन चिमुकले अर्धवट जळालेल्या अवस्थेत, महिलेच्या उजव्या हातावरती जय भीमचा टॅटू
खंडाळे माथा येथे तिहेरी हत्याकांड महिलेसह दोन चिमुकले अर्धवट जळालेल्या अवस्थेत, महिलेच्या उजव्या हातावरती जय भीमचा टॅटू
प्रतिनिधी: सुदाम दरेकर :-
शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षाची मुलगी असे तीन अर्धवट मृतदेह अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे.
लहान बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांचे मन गहिवरून आले असुन.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी घटनास्थळाची पाहणी करून जलद गतीने आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत .
रांजणगाव गणपती खंडाळे माथा येथील पुणे अहिल्यानगर हायवेजवळ, ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले असुन. मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ‘जय भीम’ असे गोंदलेले टॅटू असल्याचे पोलिसांना आढळले आहे
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, महिला पोलीस अधिकारी सविता काळे, खंडाळ्याच्या पोलीस पाटील सीमा खेडकर, रांजणगावच्या पोलीस पाटील सारिका पाचुंदकर व पोलीस कर्मचारी यांनी सदर घटना स्थळाचा पंचनामा केला असुन.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळी श्वान पथकाने ही माग घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलीस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.
