ताज्या घडामोडी

Chloride metals limited (CML) कंपनीच्या शेजारील माती, पाणी तसेच कंपनीच्या धुराचे ऑडिट करावे……. मनसे नेते रविश रासकर यांची प्रदूषण विभागाला मागणी.

Chloride metals limited (CML) कंपनीच्या शेजारील माती, पाणी तसेच कंपनीच्या धुराचे ऑडिट करावे……. मनसे नेते रविश रासकर यांची प्रदूषण विभागाला मागणी.

प्रतिनिधी /प्रतिक शेळके

CML ही कंपनी सुपा फेज २ म्हसनेफाटा एमआयडीसी मध्ये असून तेथील स्थानिक शेतकऱ्यांच्या व आजूबाजूच्या लोकांच्या तक्रारीनुसार शेतकऱ्यांच्या विहिरींचे पाणी, तळ्याचे पाणी हे पूर्णतः केमिकल युक्त झाले आहे.
तिथे आसपास सर्वांचेच स्थानिकांसाठी पिण्यासाठी पाणी योग्य राहिले नाही. तेथे शेतमाल ही व्यवस्थित येत नाही. तेथील जनजीवन हे विस्कळीत झाल्यामुळे सर्वांनी मनसे नेते रविश रासकर यांच्याकडे मागणी केली आहे की कंपनीच्या जवळच्या पाण्याची मातीचे आणि कंपनीच्या तळ्यातील विहिरींचे पाणी हे परीक्षण करण्यासाठी टेस्टिंग न्यावे आणि अहवाल सादर करावा. त्या अहवालात जर ती कंपनी दोषी आढळली तर ती कंपनी तेथून हलवण्यात यावी जेणेकरून सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही.
मनसे नेते रविश रासकर यांनी मागणी केली आहे की कंपनीमध्ये वेस्टेज बॅटरीच्या लिक्विड चा स्टॉक कुठे करून ठेवला असेल तर त्याचे ऑडिट करून सत्य अहवाल सादर करावा. धुराचे नमुने आणि पाणी व मातीचे निरीक्षण करून 30 दिवसांच्या आत सत्य अहवाल सादर करावा. त्यात ती कंपनी दोषी आढळली तर त्या कंपनीवर काय कारवाई केली याचा अहवाल सादर करावा असे मनसे नेते रविश रासकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ अहिल्यानगर उपप्रादेशिक अधिकारी चंद्रकांत शिंदे साहेब यांना निवेदन दीले, तसेच पुढीप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक, प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई, उपअभियंता साहेब एमआयडीसी नवनागापुर, तहसीलदार साहेब यांनाही निवेदन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!