ताज्या घडामोडी

सिसपे (Sispay)कंपनीची चौकशी करा* सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे यांचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना निवेदन सिसपे (Sispay) ,Infinite beacon, VG Growth या नावांमध्ये सतत बदल करत असून या कंपनीची आपल्या आर्थिक गुन्हे शाखेकडून लवकरात लवकर चौकशी व्हावी

सिसपे (Sispay)कंपनीची चौकशी करा
सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे यांचे पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांना निवेदन

सिसपे (Sispay) ,Infinite beacon, VG Growth या नावांमध्ये सतत बदल करत असून या कंपनीची आपल्या आर्थिक गुन्हे शाखेकडून लवकरात लवकर चौकशी व्हावी

प्रतिनिधी/ प्रतीक शेळके 

सिसपे SISPAY, Infinite Beacon,VG Growth ही कंपनी वेळोवेळी नावांमध्ये बदल करून वेगवेगळ्या नावाने मोठ्या रकमा वेगवेगळ्या खाजगी बँक अकाउंटला मोठाल्या रकमा घेऊन वाघुंडे,पळवे,म्हसणे,आपधूप,बाबुर्डी,सुपा तसेच पारनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांना १०टक्के व्याजदराने परतावा देत असून या कंपन्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून घेत आहेत तरी सुपा परिसरामध्ये MIDCमध्ये क्षेत्र गेल्या कारणाने नागरिकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध झाला असून यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाघुंडे व ईतर भागामधील काही नागरिक या कंपनीचे अधिकृत एजंट असून नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन च्या अपेक्षेने तसेच बाहेर देशाच्या पिकनिक ट्रीप मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कंपनीमध्ये रकमांचा भरणा करून घेत आहे तरी ही कंपनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता मोकाट पद्धतीने चालु आहे व नागरिकांना आपणास शासनाची परवानगी आहे असे भासवत असून आत्ता आपली श्रीगोंदा व सुपा येथे Infinite Multistate या नावाने आपण बँक चालू केली आहे तरी ही कंपनी कुठलीही फ्रौड कंपनी नाही असे सांगत असून तुम्ही बिनधास्त रकमेच्या ठेवी ठेवा व मोठ्या प्रमाणात व्याजदर मिळवा असे सांगून नागरिकांची फसवणूक करत आहे तरी या कंपनीचा ठेवी रकमेची अंदाजे १२०० ते १३०० कोटी रुपये रकमेच्या ठेवी झाल्या आहेत असे गुंतवनुकदारांकडून समजते .तरी मार्केट मध्ये आलेल्या TORRES कंपनी SSO.ASTER,SBN,DABUR,BIG HOT,MANIMAX,अत्तरबाटली अश्या विविध प्रकारच्या कंपन्यांनी सुपा व पारनेर परिसरातील नागरिकांना मोठ्या रकमेचा गंडा घालुन हे सर्व पसार झाले आहे आपल्या रकमा बुडाल्या असल्या कारणाने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे .तरी वाघुंडे, पळवे,म्हसणे,आपधूप,बाबुर्डी,सुपा या ठिकाणी नागरिकांचे मोठाल्या रकमा महिन्याकाठी जमा व ट्रान्स्फर झालेले अकाउंट चेक करण्यात यावे तसेच ह्या रकमा जमा होत असताना शासनाचा मोठ्या प्रमाणात GST बुडविला जात असून TORRES कंपनी सारखी पुनरावृत्ती सुपा व इतर शहरांमध्ये होऊ नये यासाठी आपल्या कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखा या विभागाकडून याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या अर्जावारती आपल्याकडून 11 दिवसांमध्ये कार्यवाही न झाल्यास आपल्या कार्यालयामध्ये उपोषणाच्या व आंदोलनाच्या मार्गाचा आपणास पत्र व्यवहार करून अवलंब करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलथे व मा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष व योगेश कुलथे यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब जिल्हाधिकारी साहेब अहील्यानगर, पालकमंत्री साहेब आहील्यानगर, व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!