हरिनाम सप्ताह मध्ये महाराजांना हार घालण्यावरून हाणामारी
हरिनाम सप्ताह मध्ये महाराजांना हार घालण्यावरून हाणामारी
ढवळगाव वार्ताहर – अमोल बोरगे
श्रीगोंदा तालुक्यातील आरणगाव दुमाला येथे हरिनाम सप्ताह मध्ये अध्यात्माला गालबोट लागन अशा प्रकार घडला आहे. १३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान हरिनाम सप्ताह मध्ये अहिल्यानगर येथील रामचंद्र महाराज दरेकर घोडेगावकर यांचे हरिनाम सप्ताह निमित्त सुस्राव्य किर्तन झाले त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कीर्तन सेवा केली त्यामध्ये त्यांनी श्री.संत निळोबारायांचा अभंग घेतला होता व त्या अभंगाचे त्यांनी अतिशय मार्मिक व चांगल्या पद्धतीने अभंगाचे निरूपण केले. संपूर्ण किर्तन झाल्यानंतर महाराजांना हार घालण्यासाठी गावातील एक ग्रामस्थ हार घालण्यासाठी ऊठले असता शेजारी दुसरा ग्रामस्थ उठून हार घालणाऱ्या ग्रामस्थाच्या हातातून हार हिसकवून घेण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.काही ग्रामस्थांनी हा वाद मंदिराच्या मागे मिटवण्याचा प्रयत्न केला परंतु मंदिराच्या मागे वाद मिटला नसून या वादाचे चांगलेच हाणामारी मध्ये रुपांतर झाले. महत्वाचे म्हणजे हा वाद चालू आसताना कीर्तनासाठी आलेले टाळकरी माळकरी गावकरी महिला वर्ग हे जागचे उठले सुद्धा नाही त्यांनीही हाणामारीचा मनसोक्त आनंद घेतला.तरुणांनी मध्यस्थी करून वाद मिटवला व हार घालण्यासाठी उठलेले पहिले ग्रामस्थ यांच्या हस्ते महाराजांना हार घालून या वादावर शेवटी हरी विठ्ठल करून पडदा टाकण्यात आला व सर्व गावकरी मनसोक्त प्रसादाचा लाभ घेऊन घराकडे मार्गस्थ झाले.
ग्रामस्थांनी अध्यात्म मध्ये कोणतेही राजकारण न करता एकत्रित येऊन हरिनाम सप्ताह व धार्मिक कामे पुरवतास नेले पाहिजे
अनेक हरिनाम सप्ताह मध्ये सध्या गट-तट निर्माण होत आहे.त्यामुळे अध्यात्माला कुठेतरी गाल बोट लागत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे गावातील ग्रामस्थांनी अध्यात्म मध्ये कोणतेही राजकारण न करता एकत्रित येऊन हरिनाम सप्ताह व धार्मिक कामे पुरवतास नेले पाहिजे –
संगीत रामायण कथाकार ह.भ.प.संतोष महाराज कौठाळे ( देवदैठणकर )
( स्रोत – प्रत्यक्ष असणारे प्रेक्षक ग्रामस्थ )
