विठाई हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य रुग्णांची सेवा होईल -पद्मश्री पोपटराव पवार
विठाई हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य रुग्णांची सेवा होईल -पद्मश्री पोपटराव पवार
श्रीगोंदा प्रतिनिधी – अमोल बोरगे
विठाई हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्य रुग्णाची सेवा हॊईल असे प्रतिपादन समाजसेवक पोपटराव पवार यांनी केले.
डॉ.प्रशांत बो-हुडे व डॉ.सौ.दीप्ती बो-हुडे यांनी श्रीगोंदा नगर परिषदेच्या हद्दीत सुरू केलेल्या मिठाई हॉस्पिटलचे “लोकार्पण” पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न झाले त्या प्रसंगी ते बोलत होते.
सदर लोकार्पण सोहळ्यास आमदार काशिनाथ दाते सर माजी मंत्री व जिल्ह्याचे जेष्ठ नेते व मा. श्री बबनराव पाचपुते मा.जि प चे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार जेष्ठ नेते घनश्याम शेलार मा.जी.सदस्य वसंतराव चेडे पणन महामंडळाचे अध्यक्ष दत्ता शेठ पानसरे,मा. जि. प सदस्य अनिल ठवाळ साहेब डॉ. मनोज तोडकर डॉ. विजय भोसले, डॉ.संजय चव्हाण, डॉ तुषार रोहोकले, डॉ. सचिन नवले शिक्षक नेते रावसाहेब रोहोकले, राहुल पाटील शिंदे इ.मान्यवर या कार्यक्रमास हजर होते.
श्रीगोंदा शहरात व पंचक्रोशीत हाडांचा डॉक्टर उपलब्ध नव्हता त्यांची फार आवश्यकता असताना डॉ.प्रशांत बोरुडे यांनी एक्सीडेंटल हॉस्पिटल सुरू केलेले आहे. त्यांच्याकडे तज्ञ व अनुभवी डॉक्टरांची टीम उपलब्ध असल्याने येथील नागरिकांना त्यांचा फायदा होईल. पुणे,अहिल्यानगर या ठिकाणी जाण्याची यापुढे आवश्यकता लागणार नाही विठाई हॉस्पिटलमध्ये हाडांच्या संदर्भातील लहान मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत अशी माहिती डॉक्टर संजय चव्हाण व डॉक्टर मनोज तोडकर यांनी दिली.
या हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांची सेवा निश्चित पणे होईल व या हॉस्पिटलला उज्वल भविष्य असल्याचे आमदार दाते सर यांनी गौरव उदगार काढले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण क्षेत्रातील, सहकार क्षेत्रातील वैद्यकीय क्षेत्रातील, अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेश बोरुडे यांनी केले तर आभार रावसाहेब रोहकले यांनी मानले.
