ताज्या घडामोडी

शुक्रवार दिनांक 11 ते सोमवार 14 पासून पळवे खुर्द येथील काळभैरवनाथाचा यात्रा उत्सव सुरू

शुक्रवार दिनांक 11 ते सोमवार 14 पासून पळवे खुर्द येथील काळभैरवनाथाचा यात्रा उत्सव सुरू

प्रतिनिधी :- सुदाम दरेकर पारनेर :-

आज शुक्रवार दि. 11 पासून श्री काळभैरवनाथाच्या यात्रा उत्सवात सुरुवात होत आहे आज चावदस म्हणजे पौर्णिमेचा आदला दिवस या दिवशी पुजाऱ्याला नवरदेवासारखे नटवतात फक्त बाशिंगच बांधत नाही. पूर्वी त्या व्यक्तीच्या पाठीला गळ टोचत असे परंतु ते कालांतराने बंद झाले म्हणून त्याला गडकरी म्हणतात चावदशीच्या दिवशी वाजत गाजत देवाची पालखी मंदिराच्या बाहेर काढली जाते व गावातून मिरवणूक काढली जाते. आणि संध्याकाळी दर्शन सोहळा हा कार्यक्रम ठेवला जातो या ठिकाणी पळवे खुर्द पळवे बुद्रुक येथील भाविभक्त बहुसंख्येने उपस्थित राहतात या ठिकाणी देवाला नैवेद्य प्रसाद वाढवला जातो. या ठिकाणी बाहेरगावी असणारे सुद्धा गावकरी फक्त गण त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहतात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. मंदिरालाही पालखीलाही फुलांची सजावट केली जाते हा दर्शन सोहळा संपन्न झाल्यानंतर सायंकाळी ठीक ८:०० वाजता गावकरी पुजारी भक्तगण ही पालखी घेऊन जातेगाव ला जातात पौर्णिमेच्या दिवशी तेथे मोठी यात्रा भरते पाच गावे एकत्र येतात. शोभेच्या दारूची खूप आतश बाजी होते. आलेले सर्व भक्तगण खूप आनंद लुटतात दर्शनासाठी गर्दी ही करतात गावचे सर्व मानकरी आपल्या काठ्या कावडी घेऊन येतात त्यामध्ये राऊ गावचा सोहळा पाहण्यासारखा असतो या ठिकाणी पळवे व पानोली या गावाचा मान असतो दोन्ही गाव त्या ठिकाणी एकत्र होतात आणि भेटतात याला भक्तांच्या भेटी असे म्हटले जाते. ही फार वर्ष पूर्वीचे चालत असलेली परंपरा आहे. ही परंपरा अजूनही भक्तांनी व गावकऱ्यांनी सांभाळली आहे. पाचही गावे एकत्र येऊन खूप आनंदाने व उत्साहाने हा उत्सव साजरा करतात. भैरवनाथांनी पळवे गावच्या राम बाबांनी खूप मोठा व कधी न संपणारा असा वसा दिला आहे. तोच वसा आजही जाधव भक्तांनी वंशपरंपरेने चालवला आहे असे हे भैरवनाथ व जोगेश्वरी माता यांचा लग्नाचा सोहळा मानला जातो. खरोखर हा सोहळा पाहतात कधी संपू नये असे वाटते मन भारावून टाकणारा हा पाच दिवसाचा सोहळा नकळत संपतो आणि मनाला हुरहुर लागते पालखी जातेगाव वरून परत येताना भक्तांचा घाम निघतो कारण येताना पालखी जड होते जोगेश्वरी माता पालखीत बसून पळवे गावी येताना यात्रा झाल्यावर काही दिवस मन लागत नाही असे भक्तांच म्हणणं आहे पुन्हा नववर्षाच्या चैत्र महिन्याची मनाला आस लागून राहते धन्य ते राम बाबा की त्यांच्या पाठीशी आजही भैरवनाथ जोगेश्वरी माता यांचे वरदान टिकून आहे. अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी डंबाळे यांनी दिली. तसेच या यात्रा उत्सवात बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शशिकांत आप्पा देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!