म्हसने येथे शिवजयंती साजरी करण्यात आली छत्रपती शासन प्रतिष्ठान यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
म्हसने येथे शिवजयंती साजरी करण्यात आली
छत्रपती शासन प्रतिष्ठान यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले
प्रतिनिधी – प्रतीक शेळके
पारनेर तालुक्यातील म्हसने येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला नमन व स्मरण करण्याच्या हेतूने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी सूपा गावाचे सरपंच योगेश रोकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली व छत्रपती शासन प्रतिष्ठान यांनी शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांसाठी हळदकुंकू समारंभ व ह भ प सागर महाराज सांगळे यांचे कीर्तन झाले. या वेळी गावातील जनसमुदाय उपस्थित होता
