केडगाव येथील महानगरपालिका महिला व्यायाम शाळा या ठिकाणी जागतिक ध्यान दिवस साजरा
केडगाव येथील महानगरपालिका महिला व्यायाम शाळा या ठिकाणी जागतिक ध्यान दिवस साजरा
प्रतिनिधी :- सुदाम दरेकर
केडगाव येथील आहार तज्ञ आणि योगशिक्षिका ज्योती येणारे यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ध्यानाचे महत्त्व आणि योगाचे महत्त्व समजून सांगितले.
आहार तज्ञ आणि योगशिक्षिका ज्योती येणारे असे वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतात जेणेकरून महिलांमध्ये जागृती निर्माण करण्याचं काम ते त्या करतात ह्या ध्यान दिवसाच्या निमित्ताने त्यांनी महिलांना संदेश दिला आहे की आपलं स्वास्थ्य शरीर आणि मन हे दोन्हीही जर निरोगी असेल तर आपण आणि आपले कुटुंब कायमस्वरूपी आनंदी आणि उत्साही राहू शकतो जवळजवळ आज एक वर्ष झाले आहे त्यांचा योग क्लास केडगाव येथे नियमितपणे चालू आहे गेले सात वर्षे झाले त्या आहार तज्ञ म्हणून अहिल्यानगर मध्ये काम पाहतात ह्या वेळेस त्यांनी सांगितले की काहीही झाले तरी स्वतःसाठी आपण एक तास काढणे खूप गरजेचं आहे हीच निरोगी राहण्याची आपली खरी गुरुकिल्ली आहे व्यायाम करण्यासाठी ध्यानधारणा करण्यासाठी आपण जो कंटाळा करतो त्यामधूनच आपल्याला आजार निर्माण होतात किंवा टेन्शन येते निगेटिव्हिटी वाढते स्ट्रेस त्याच्यातून झोप न येणे हे सगळे आजार तयार होतात व बीपी थायरॉईड डायबिटीस आणि पीसीओडी सारखे आजार आपल्याला जडतात आहारतज्ञ आणि योगशिक्षिका ज्योती येणारे अशा पद्धतीने कायम महिलांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडून व्यवस्थितपणे व्यायाम आणि रोजच्या रोज ध्यानधारणा करून घेतात.
ह्या प्रसंगी रत्नमाला भोर , राधाबाई येणारे,दिपाली मेहेर , संगीता जाधव, नेहा ओझा, सोनाली कोलपकर , नीता रोकडे, शोभा धामणे , नैना पालेकर ,सोनिया दीक्षित, वसुधा दहातोंडे, मीनाक्षी काठमोडे , शीतल जांगडा, ज्योती सातपुते सारिका भापाकर , सुनंदा सोनवणे ,सुवर्णा चोरडिया ,मेघा कावरे, पूनम देशमुख उपस्थित होत्या.
