पंढरीच्या आदित्यची विद्यार्थी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण व रौप्य भरारी
पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेचे शिक्षक विठ्ठलराव पिंपळनेरकर यांचे चिरंजीव आदित्य पिंपळनेरकर यांनी नुकत्याच मलेशियात झालेल्या विद्यार्थी ऑलंपिक स्पर्धेत सहभाग घेत आशिया विभागात 17 वर्षे खालील बॅडमिंटन खेळात पुरूष विभागात रौप्यपदक तर पुरूष दुहेरीत सुवर्ण पदक मिळविले. आदित्यचे आज पंढरीत आगमन झाल्यानंतर त्याचे चौफाळ्यात जंगी स्वागत करण्यात आले. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरीचे नाव कोरले गेले आहे.
मलेशियातील या ऑलम्पिक स्पर्धेत आदित्य याने विविध देशातील स्पर्धकांना पराभूत केले व या पदकांवर आपले नाव कोरले आहे. त्याच्या यशाची बातमी पंढरीत आल्यानंतर येथील युवकांनी आज या यशस्वी खेळाडूचे जंगी स्वागत केले.
